मुरूम हद्दीतील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसाय अड्ड्यावर कारवाई ;
दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात तर तीन युवकाविरुद्ध गुन्हा ,

मुरूम,दि.२८

धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक 
प्रतिबंधक विभागाने मुरूम पोलिस ठाणे हद्दीतील तुगाव फाट्यावर उघडपणे सुरू असलेल्या  वेश्या व्यवसायावर धाडसी  कारवाई केली आहे. या कारवाईत दोन बांगला देशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले असून तीन युवकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आले आहे.

  दरम्यान जिल्हास्तरावरील पथकाने  कारवाई केल्याने स्थानिक मुरूम पोलिस अधिकाऱ्याच्या  कार्यपद्धतीवर शंका व्यक्त होत असून या ठाण्याच्या प्रमुख अधिकाऱ्यामुळे  मुरूम हद्दीतील कायदा आणि सुव्यवस्था कितपत सुरक्षित आहे हे यावरून स्पष्टपणे दिसते


राष्ट्रीय महामार्ग सोलापूर ते उमरगा रस्त्यावरील मुरूम पोलिस ठाणे हद्दीत येत असलेल्या तुगाव मोडवरील एका धाब्यामध्ये गेली अनेक महिन्यापासून गैर मार्गाने वेश्या व्यवसाय सुरू होता.याबाबत  गुप्त माहिती प्राप्त झाल्याने धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने दि 27 रोजी सांयकाळी 4 च्या सुमारास  सदरील धाब्यावर  धाडसी कारवाई केली रात्रभर चौकशीची प्रक्रिया पार पडली त्यानंतर झालेल्या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात घेण्यात आले  तर गैर मार्गाने वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या तीन युवकांविरुद्ध मुरूम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .याप्रकरणी धाराशिवचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक  विभागाचे  पोलीस अधिकारी आर एस गायकवाड पुढील तपास करत आहेत दरम्यान बऱ्याच महिन्यापासून या भागात गैर मार्गाने वेश्या व्यवसाय सुरू होता. याबद्दल  मुरूम पोलिस ठाणे अधिकाऱ्याला किंचितही माहिती नसेल असे नसेलच. असले घाणेरडे प्रकार खुलेआम सुरू असताना याविरुद्ध कारवाई करण्याऐवजी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा कृत्य मुरूम पोलिस  यांनी का? करत राहिले याबद्दल   शंका उपस्थित होत आहे. अखेर जिल्ह्याच्या पथकानेच कारवाई करून पोलिस कर्तव्याची  जाणीव करून दिली आहे.
 
Top