नळदुर्ग: नगराध्यक्ष, नगरसेवक पदाची निवडणूक लढविण्यासाठी   अनेक इच्छुक
 सरसावले ; नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत कायदे तज्ञाची भर

नळदुर्ग,दि.२७: शिवाजी नाईक 
 
नळदुर्ग नगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडीना वेग आला आहे.भाजप  स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याने  कोणत्याही पक्षाने युती  करण्याबाबत संकेत दिले नाही . त्यामुळे  राजकीय पक्षाकडुन उमेदवारी मिळविण्यासाठी नगराध्यक्ष, नगरसेवकपदाची निवडणूक लढविण्यासाठी  इच्छुक अनेकजण पुढे सरसावल्याची  चर्चा रंगली आहे.

आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी शहरात काही पक्षाचे संपर्क कार्यालय उघडण्यात आले आहे. यंदाची होवु घातलेली निवडणुक अत्यंत चुरशीची व अटीतटीची होणार असे चित्र निवडणुक जाहिर होण्यापूर्वीच निर्माण झाल्याचे दिसून येत आहे.

नळदुर्ग  नगरपालिकेचे नगराध्यक्षपद
खुल्या प्रवर्गाला सुटल्याने व प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने निवडणुकीतील मोर्चेबांधणीला प्रचंड वेग आला आहे. मूळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी भाजपाशी हातमिळवणी केल्याने यंदाची निवडणूकीची रणधुमाळी गाजणार असे नागरिकातुन बोलले जात आहे.

नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे शहराध्यक्ष बसवराज धरणे, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागिरदार तर काँग्रेस पक्षाकडून अँड अरविंद बेडगे, माजी नगराध्यक्ष शहाबाज काझी यांच्या उमेदवारीबाबत या दिग्गजांचे
नावे आघाडीवर असल्याची जोरदार चर्चा होत आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे हे नगराध्यक्षपदासाठी योग्य व सक्षम उमेदवार देणार की ऐनवेळी निवडणूक रिंगणात उतरणार याचा निर्णय अद्यापही जाहिर केले नाही.
त्याचबरोबर  उद्धवसेनेकडून सरदारसिंग ठाकूर तर शिंदे सेनेकडून ज्ञानेश्वर घोडके, निखिल घोडके यांची नावे नगराध्यक्षांच्या उमेदवारीकरिता  सध्यातरी चर्चेत आहेत. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
----------
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील यांचे निकटवर्तीय म्हणून अँड  अरविंद बेडगे हे ओळखले जाते. त्यांनी  कायदयाचे उच्च शिक्षण घेतले आहे. ते उच्च शिक्षित व प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून त्यांचे नावलौकिक आहे.नळदुर्ग शहर व परिसरात वकिली व्यवसायाच्या माध्यमातून त्यांचा मोठा जनसंपर्क आहे.त्याचबरोबर तुळजापूर तालुका बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी त्यांची बिनविरोध निवड झाली होती.
 पहिल्यांदाच नगराध्यक्ष पदासाठी काँग्रेसकडून ईच्छुक उमेदवार म्हणून त्यांच्या  नाव पुढे आले आहे. सन २०११ मध्ये न.प. च्या निवडणुकीत त्यांच्या सुविधा पत्नी सौ अर्पणाताई अरविंद बेडगे ह्या  काँग्रेसच्या उमेदवारीवर प्रभाग क्रमांक ३ मधुन नगरसेविका म्हणून सर्वाधिक मतांनी निवडून आल्या होत्या.त्यानंतर सन २०१३ मध्ये त्यांची उपनगराध्यक्षपदी निवड झाली. त्यांनी शहर विकासासाठी सातत्याने प्रयत्न केल्याचे सर्वश्रुत आहे.
--------
शहाबाज काझी हे  वयाच्या एकविसाव्या वर्षी १९९२  ते आजपर्यंत नगरसेवक आहेत.२०१४ साली नगराध्यक्ष झाले , २०१२ ते २०१४  दक्षिण सोलापूरचा निरीक्षक, १९९७ ते२००० या कालावधीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक सेल प्रदेश चिटणीस, २०१८ पासुन उपाध्यक्ष जिल्हा काँग्रेस कमेटी, सहसचिव बालाघाट महाविद्यालय, नगराध्यक्ष कालावधीत शहराचा विकास साधण्याचा प्रयत्न केला.त्यानी सन २००५ ते २०१५ मध्ये संजय गांधी निराधार योजनांतर्गत  २ हजार ६०० लाभार्थ्यांना लाभ मिळवुन दिला.


 
Top