अतिवृष्टीने बाधित २१० कुटूंबाना किराणा साहित्याचे किटचे वाटप ; कोल्हापूरच्या सा.रे. पाटील सोशल फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम

नळदुर्ग,दि.०३ :


दहिटणा . बुधवार दि ०१ ऑक्टोबर २०२५ रोजी डॉ. आप्पासाहेब उर्फ सा.रे. पाटील सोशल फाउंडेशन ,शिरोळ जि. कोल्हापूर व श्रीदत्त उद्योग समुह शिरोळ यांच्या मार्फत मौजे दहिटणा ता. तुळजापूर येथील  अतिवृष्टीमुळे बाधित २१० कुटुंबाना किराना किटचे वाटप करण्यात आले.

   
यावेळी सोशल फाउंडेशनचे प्रतिनिधी  चौगुले , कांबळे , दहिटणा गावच्या सरपंच श्रीमती शिवकांता कांबळे, ग्रामपंचायत अधिकारी  महेश मोकाशे, तलाठी  गायकवाड एम्.एस्., नळदुर्ग सज्जाचे महसुल अधिकारी विश्वास वायचळ, सामाजिक कार्यकर्ते  नागनाथ पाटील,  सोमनाथ गुड्डे, उमाकांत कदम, बलभीम कदम,  कल्याण बिराजदार, पोलीस पाटील श्रीमती संगीता बनसोडे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष  राजकुमार नागरसे उपस्थित होते. यावेळी गावच्या वतीने  बसवेश्वर पाटील यांनी सोशल फाउंडेशनचे आभार मानले.
 
Top