श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.चा पाचवा गाळप हंगाम प्रारंभ

धाराशिव,दि.०२:

 शेतकरी बांधवांच्या अथक परिश्रम, सहकार्य आणि विश्वासामुळे श्री सिद्धिविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लि.च्या कारखान्याचा पाचव्या गाळप हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्याचे उद्घाटन मातोश्री श्रीमती मीनाताई काशिनाथराव कुलकर्णी यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन करून करण्यात आले. 

यावेळी श्री सिद्धिविनायक परिवाराचे संस्थापक अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, एमडी दिनेश कुलकर्णी, व्यंकटेश कोरे, नांदुरीचे सरपंच हनुमंत पाटील, ग्रीनटेकचे एमडी गणेश कामटे, आग्रीटेक संचालक ॲड.प्रतिक देवळे, श्री सिध्दीविनायक डिस्ट्रिक्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी देविदास कुलकर्णी, सुजित साळुंके, प्रथमेश आवटे, शेतकी अधिकारी मंगेश कुलकर्णी, विकास उबाळे, अभय शिंदे, बालाजी जमाले, ऋषीराज दहिफळे, प्रगतशील शेतकरी विजयकुमार रोकडे, मारुती माळी, मकरंद धोंगडे, शुभम मुंडे, महादेव फुलारी, गजानन पाटील, संजीव चीलवंत, गणेश धुरगुडे, प्रदीप धोंगडे, प्रणव कुलकर्णी, कैलास चौधरी यांच्यासह परिसरातील शेतकरी बांधव  उपस्थित होते.
 
Top