✴️हमारा यारा 🧡 :नळदुर्ग शहरांमध्ये हिंदी भाषा रुजवणारे व्यक्तिमत्व चंद्रकांत दस निवडणुकीच्या रिंगणात

नळदुर्ग ,दि.३०: शिवाजी नाईक 

 मागील ३५ वर्षापासून नळदुर्ग शहरातील राजकारणाचा बारीक- सारीक अभ्यास करत समाज कार्य करणारे नाव म्हणजे चंद्रकांत नरसू दस उर्फ नळदुर्ग करांचा लाडका 'यारा भाई'. यारा भाई हे  अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या प्रभाग दोन मधून नळदुर्ग नगरपालिकेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्या दृष्टीने याराभाई यांनी प्रभाग दोन पिंजून काढला आहे. यारा भाई हे कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे गुलदस्त्यात असले तरी त्यांनी निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.


नळदुर्ग शहरात बॉलीवूड नंतर जर कोणी हिंदी भाषा रुजवली व वाढवली असेल तर ते आहेत यारा भाई. आपले बोलतानाची विशिष्ट लकब यामुळे यारा भाई सगळ्यांना परिचित आहेत.
यारा भाई हे तुळजापूर तालुक्याचे माजी आमदार कै. नरेंद्रजी बोरगावकर साहेब यांचे कट्टर समर्थक आहेत.
माजी नगराध्यक्ष कै. उदयभाऊ जगदाळे यांचा राजकीय प्रवास जवळून पाहणारे व कै. उदय जगदाळे यांच्या यशस्वी राजकीय वाटेवर चालवण्यासाठी यारा भाई सज्ज झाले आहेत. राष्ट्रवादीचे महबूबभाई शेख व अजित अण्णा झुनैदी यांचे जीव की प्राण असलेले यारा भाई राजकीय पटलावर आपले नशीब आजमावणार आहेत. 

 शहरातील हिंदू धर्मीयांसह मुस्लिम धर्मियांशीही याराभाई यांची घनिष्ठ मैत्री आहे. याचा फायदा यारा भाई यांना नक्कीच होणार आहे.

👉🧡यारा भाई यांचा नळदुर्ग शहरासाठी व शहरवासीयांसाठी मानस-
▶️शहरात हिंदी भाषा अध्यसन केंद्र उभारणे.
▶️ शहराचा पाणी प्रश्न सोडवणे. 
▶️ बेळगाव शहराच्या धर्तीवर नळदुर्ग शहरात अंडरग्राउंड ड्रेनेज
▶️नागरिकांचे प्रश्न जागेवर सोडवणे
▶️तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. 
▶️ शहरालगत औद्योगिक वसाहत उभारणे.
▶️ आधुनिक युगातील गरजेनुसार युरोपीय पद्धतीने नळदुर्गचा विकास करणे.
 
Top