अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्तांना प्रशासनाकडून धनादेश वाटप
मुरुम,दि.१६:
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे घरांची पडझड व दुकानात पाणी शिरल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते. नुकसानग्रस्तांना भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे व तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते शासनाच्या वतीने आर्थिक मदतीचे धनादेश देण्यात आले.
उमरगा तालुक्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरात पाणी गेले घर कोसळले. कपड्याचे शोरुम, किराणा दुकान आदी दुकानात पाणी शिरल्याने खूप नुकसान झाले तात्काळ पंचनामे करून अतिवृष्टीमुळे नुकसान झाले अशा कदेर, गुंजोटी, दाळिंब, येणेगूर, बेळंब व मुरूम आदी गावातील नुकसानग्रस्तांना उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण बसवराज पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे व उमरगा तहसीलदार गोविंद येरमे यांच्या हस्ते शासनाची मदत स्वरूपात धनादेश वाटप करण्यात आले.
यावेळी उमरगा पंचायत समितीचे माजी सभापती मदन पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रफिक तांबोळी, डाॅ. विक्रम जिवनगे, रविंद्र ढंगे, योगेश राठोड, महालिंग बाबशेट्टी, गौस शेख, अमर भोसगे, बाबा शिकलगर, सुजित शेळके, महानंद कलशेट्टी, भाजप मुरुम मंडळ अध्यक्ष गणेश अंबर, सचिव राजु मुल्ला, मुरूमचे माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, श्रीराम राठोड, गुंजोटीचे माजी सरपंच शंकरराव पाटील, साधू गायकवाड, कदेर सरपंच सतिश जाधव, सुधिर चव्हाण, पंकज बनसोडे, धनराज जाधव, सिद्राम देशमुख, सुनिल पाटील, मनोज गुरव, महेश पाटील, पिंटू साखरे, तम्मा शेटगार, बाळू चौधरी, लिंबराज पाटील, योगेश पाटील, रवि देशमुख, सरपंच परशुराम देवकते, इक्बाल पटेल, सादिक चाकूरे, अब्दुल गुत्तेदार, अप्पू गुंजोटे, विजय सोनकटाळे, धनराज पाटील, दत्ता बिराजदार, शेषेराव पाटील, सैफन चौधरी, गणेश पाटील, मुस्तफा कागदी, सचिन नागोबा, चाँद गवंडी आदीसह शेतकरी उपस्थित होते.