प्रधानमंत्री स्वनिधी अंतर्गत 30 लाभार्थ्यांना  हजाराचे कर्ज वाटप

नळदुर्ग,दि.१८:

 दि .१७ ऑक्टोंबर रोजी नगरपरिषद नळदुर्ग व स्टेट बँक ऑफ इंडिया आणि श्री समर्थ बहुउद्देशीय संस्था नळदुर्ग यांचे संयुक्त विद्यमाने पीएम स्वनिधी अंतर्गत कॅम आयोजित करण्यात आले. त्यामध्ये पात्र लाभार्थ्यांना कर्ज वाटप करण्यात आले. 

त्याचबरोबर अपात्र लाभार्थ्यांच्या त्रुटीची पूर्तता कारुन घेण्यात आले. सदर कॅम्पला माजी नगरसेवक बसवराज धरणे, माजी नगरसेविका सुनंदा जाधव, बँकेचे व्यवस्थापक घोडके, लोण विभागाचे  शिवम बराटे, नगर परिषदचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुरज गायकवाड तसेच बँकेचे अधिकारी कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
 लहान, लहान स्थिर व फिरता व्यवसाय करणाऱ्या लाभार्थ्यांना किंवा पथ विक्रेते यांना 15 हजार 25 हजार व 50 हजाराचे कर्ज घेऊन व्यवसाय उभा करण्यासाठी सहाय्य या योजनेचा लाभ घेण्याचे  नागरिकांना आवाहन करण्यात आले.
 
Top