शिवसैनिक रविंद्र  दबडे  खुदावाडी पंचायत समिती गणातून (महाविकास आघाडी) निवडणुकीसाठी इच्छुक 

नळदुर्ग,दि.१४:

तुळजापूर तालुक्यातील मौजे लोहगाव येथील ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच सौ लोचना रविंद्र दबडे यांचे पती तथा लोहगाव शिवसेना (उबाठा गटाचे) शाखाप्रमुख  रविंद्र अशोक दबडे हे नंदगाव गटातील खुदावाडी पंचायत समिती गणातून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत.

रविंद्र दबडे हे धाराशिवचे खासदार  ओमराजे निंबाळकर , आमदार  कैलास  पाटील यांचे कट्टर  सर्मथक शिवसैनिक आहेत. ते तुळजापूर तालुक्यातील नंदगाव गटातंर्गत येणाऱ्या खुदावाडी पंचायत समिती गणातून ( उबाठाकडून) महाविकास आघाडीकडून इच्छुक आहेत. गेल्या पाच वर्षात सरपंच असताना 225 कुटुंबांना उज्वला अंतर्गत मोफत गॅस, 300 कुटुंबांना घरकुले मंजूर करून दिले, गावातील पाण्याची सुविधा, सिमेंट काँक्रेट रस्ते, शेतकऱ्यांच्या पगारी असे अनेक कामे त्यांनी केले आहे. पंचायत समिती गणात खुदावाडी, लोहगाव, दहिटणा, वागदरी, गुजनूर,येडोळा, रामतीर्थ आदी गावाचा समावेश आहे. 

 
Top