शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या तुळजापूर शुगरचा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या थाटात ; दिड लाख मेट्रिक टन ऊस गाळाचे उद्दिष्ट - चेअरमन ॲड अनिल काळे
गेल्या गळीत हंगामात ऊसाला २ हजार ७०० रुपये प्रति टनाला भाव दिले. त्याचबरोबर एस उत्पादक शेतकऱ्यांना शंभर टक्के उसाचे पेमेंट दिले. वाहतूक व ठेकेदार यांना वेळेवर पैसे दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास या कारखान्यावर आहे. मागच्या हंगामात ४१ हजार मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले. या हंगामात दीड लाख मेट्रिक टन ऊसाचे गाळप करण्याचा उद्दिष्ट आहे. यंदाच्या गाळप हंगामातही उसाला चांगला भाव देणार असल्याचे सांगत शेतकऱ्यांनी या कारखान्यास परिपक्व ऊस देण्याचे आवाहन
तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड अनिल काळे यांनी केले आहे.
तुळजापूर शुगर प्रा. लि. काटी ता. तुळजापूर या गुळ पावडर कारखान्याचा सन २०२५-२०२६ चा पहिला गळीत हंगाम बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा मोठ्या थाटात शनिवार दि.१९ ऑक्टोंबर रोजी धनत्रयोदशीच्या मुर्हतावर कारखान्याचे चेअरमन ॲड अनिल काळे व त्यांच्या सुविधा पत्नी यांच्या हस्ते संपन्न झाले.
दि. १९ ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशीच्या शुभमुहूर्तावर तुळजापूर शुगरचे चेअरमन ॲड अनिल काळे यांच्या हस्ते सह पत्नीक बॉयलर अग्निप्रदीपनाचा कार्यक्रम झाला .यावेळी कारखाना क्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी ,वाहन ठेकेदार, कारखान्याचे कर्मचारी, अधिकारी आदीसह मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी कारखान्याचे संचालक आदित्य काळे ऋषी वडगावकर, गिरीश देशमुख, अभियंता पटेल आदीसह शेतकरी, कर्मचारी उपस्थित होते.