रोटरी क्लब मुरूम सिटीतर्फे आनंदी फाउंडेशन येथे दिवाळी फराळाच्या पदार्थांचे वाटप 

मुरूम,दि .२०: डॉ सुधीर पंचगल्ले 

दिवाळीचे औचित्य साधून रोटरी क्लब मुरूम सिटीच्या वतीने आनंदी फाउंडेशन उमरगा येथील राहणाऱ्या मनोरुग्णांना दिवाळीचा फराळाचे पदार्थ वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. 

आनंदी फाउंडेशन येथे वीस मनोरुग्न असून त्यांची अविरत सेवा करणारे जाधव कुटुंबांना एक मदत व्हावी म्हणून रोटरी क्लब मुरूम सिटीने चार दिवस पुरेल एवढा दिवाळीमध्ये करण्यात येणारे रोटरी क्लबच्या सदस्यांच्या घरी बनवलेले फराळाचे पदार्थ देण्यात आले. मनोरुग्णांना दिवाळी भेट म्हणून कपडे देण्यात आले. रोटरी क्लब मुरूम सदस्य आलेले पाहून मनोरुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला होता आणि ते मनमुराद फराळाचा आस्वाद घेतला.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लब मुरूमचे अध्यक्ष आप्पासाहेब सूर्यवंशी, सचिव कल्लप्पा पाटील, उपाध्यक्ष संतोष कांबळे, सुनील राठोड, मल्लिकार्जुन बदोले प्रा. कलया स्वामी , डॉ.नितीन डागा, बाबासाहेब पाटील ,प्रा. डॉ.सुधीर पंचगले यांनी परिश्रम घेतले.
 
Top