नळदुर्ग नगरपरिषद निवडणुक राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) स्वबळावर निवडणूक लढविणार !
नळदुर्ग,दि.१९ : शिवाजी नाईक
नळदुर्ग नगरपरिषद अध्यक्षपदासह नगरसेवक पदाची होणारी निवडणूक राष्ट्रवादी कॉग्रेस (शरद पवार गट) पक्ष नगराध्यक्ष व सर्व प्रभागात स्वबळावर निवडणूक लढविणार असल्याचे बैठकित निर्णय घेण्यात आल्याची माहिती सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल झाली आहे.याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी नगराध्यक्ष मुश्ताक कुरेशी यांच्याशी संपर्क साधले असता या वर्तला दुजोरा दिला आहे.
शनिवार दि. १८ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रवादी कॉग्रेस ( शरद पवार गट) पक्षाची
नळदुर्ग शहरात नगरपरिषद निवडणूकीबाबत पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक माजी नगरध्यक्ष मुस्ताक कुरेशी यांच्या अध्येक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीस नळदुर्ग शहर अध्यक्ष महेबूब शेख, तालुका उपाध्यक्ष बशीर शेख आदीची प्रमुख उपस्थिती होती.
नगरपरिषद अध्यक्ष व १० प्रभागातील २० नगरसेवक पदासाठी होऊ घातलेली निवडणुक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
या बैठकीवेळी राष्ट्रवादी पक्षाचे विद्यार्थी प्रदेश सचिव ताजोद्दीन बशीर शेख, युवक शहर अध्यक्ष आनंद ऊर्फ पिंटु पुदाले, अल्पसंख्याक सेल तालुका उपाध्यक्ष मिनहाज ईनामदार, अ. सं शहर अध्यक्ष वसीम कुरेशी, जावेद काझी, अ. स.कार्याध्यक्ष ईरफान कुरेशी,शिवराज धरने, अरफात सैय्यद, मज्जिद ईनामदार, दाऊद कुरेशी आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.