अशोक जगदाळे  यांची नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी; पुन्हा एकदा  एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार 


 नळदुर्ग, दि. १९, ऑक्टोबर

आगामी होणा-या नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य अशोक जगदाळे  यांची मोर्चे बांधणी सुरु आहे .योग्य व सक्षम उमेदवाराची चाचपणी सुरु असुन  पुन्हा एकदा न.प. वर एकहाती सत्ता मिळविण्याचा निर्धार व्यक्त करत त्यांनी आपली भुमिका स्पष्ट केली.

शनिवारी रोजी अशोक जगदाळे यांच्या निवासस्थानी पत्रकाराशी बोलताना सांगितले की, नगरपालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे . सन२०१६ मध्ये झालेल्या  उमेदवार निवडीतील चुका यावेळी टाळण्यात येणार असल्याचे सांगितले. सर्वसमावेशक उमेदवार निवडून नगरपालिका जिंकण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नगरपालिका निवडणुकीचे आरक्षण जाहीर होताच जगदाळे कोणती भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते. अखेर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन निवडणूक लढविण्याचा निर्णय स्पष्ट केला. मात्र सध्या नगराध्यक्ष पदाबाबत त्यांनी मौन राखले असले तरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून हे पद लढवण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होणार आहे.


राजकीय कामगिरी

ऑक्टोबर २०१४ मध्ये विधानसभा निवडणुक अक्षप म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्या निवडणुकीत माघार घेतली होती.

नोव्हेंबर २०१६ मध्ये नळदुर्ग नगरपालिका निवडणुक लढवली. त्यामध्ये नळदुर्ग नगरपलिकेवर पहिल्यांदाच एक हाती सत्ता आणली. २५ वर्ष विरोधकांच्या ताब्यात असलेल्या नळदुर्ग नगरपलिकेच्या निवडणुकीत वर्चस्व प्राप्त केले. १२ नगरसेवक व जनतेतून नगराध्यक्ष निवडुन आणला.

मार्च २०१७ मध्ये जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणुक लढवली होती. जिल्हा परिषदेच्या तालुक्यातील ९ गटापैकी चार गटात विजय मिळवला होता. त्यामध्ये मंगरुळ, काटी, काटगाव व तामलवाडी गटाचा समावेश होता, तर आठ पंचायत समित्या निवडून आणल्या. कालांतराने येथील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सदस्यांनी पक्षांतर करीत भाजपामध्ये प्रवेश केला होता.

तुळजापूर तालुका कृषी उत्पन बाजार समितीची निवडणुक लढवत चार संचालक निवडुन आणले.

जुन 2018 साली बीड-धाराशिव (उस्मानाबाद)-लातुर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लढवली. ही निवडणुक राष्ट्रवादी व काँग्रेसच्या पाठिंब्यावर म्हणून लढवली होती. त्यामध्ये थोडक्या मताने निसटता पराभव स्विकरला.

ऑक्टोबर २०१९ मध्ये तुळजापूर विधानसभा मतदासंघात निवडणुक लढवली होती. या निवडणुकीत ३८ हजार मते मिळवत तालुक्यात तिसऱ्या क्रमाकांवर राहिले होते.
 
Top