नळदुर्ग: माऊली महिला भाजनी मंडळास भारतीय जनता पार्टीच्या वतीने भजनाचे साहित्य भेट

नळदुर्ग,दि.०७ :

शहरातील व्यासनगर मध्ये  श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळयाची  मंगळवार दि.०७  ऑक्टोंबर रोजी सुरुवात झाली असुन  पारायणचे  हे 46 वे वर्षं आहे. याप्रसंगी भारतीय जनता पार्टीच्या वतीने  माऊली महिला भाजनी मंडळास  पेटी, टाळ, मृदंग असे भजनाचे साहित्य भेट देण्यात आले आहे.

भाजपचे सुशांत भुमकर, नळदुर्ग मंडल अध्यक्ष बसवराज धरणे, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे,
भाजयुमोचे जिल्हा सरचिटणीस श्रमिक पोतदार, , शहर मंडल उपाध्यक्ष संदीप गायकवाड आदींनी व्यासनगरमधील विठ्ठल रुकमाई मंदिरात श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याच्या प्रारंभी महिला भजनी मंडळास भाजनाचे साहित्य भेट दिले.

यावेळी भाजपचे नेते सुशांत भूमकर, नळदुर्ग शहर मंडल अध्यक्ष बसवराज धरणे,  शहर उपाध्यक्ष किशोर नळदुर्गकर, माजी शहराध्यक्ष धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, 
पांडुरंग पुदाले, संदीप गायकवाड, सागर हजारे, शिवाजी व-हाडे गुरुजी, चंद्रकांत कदम, शिवाजी भोसले, 

माजी नगरसेविका सुमन जाधव, सुप्रिया पुराणिक, रेखा  व-हाडे , मिनाक्षी काळे, 
विमल माने , कमल सूर्यवंशी , विजया नवगिरे, मंगल गायकवाड, छाया गायकवाड , दिप्ती मोहरीर, सुशिला भुसारे, राखी दुबे आदी उपस्थित होते. यावेळी शेवटीं आभार रेखा व-हाडे यांनी भजनी मंडळाच्या वतीने आभार मानले.
 
Top