सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर   हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा रिपाइंच्या वतीने निषेध : आरोप विरुध्द कठोर कारवाईची  मागणी 

 नळदुर्ग,दि.०७ :

 देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्याकडे पादत्रणे  भिरकावून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जातीयवादी  नराधम यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत त्या घटनेचा नळदुर्ग येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिय (आठवले) नळदुर्ग शहर व तुळजापूर तालुका शाखेच्या वतीने काळ्या फिती लावून जाहीर निषेध करण्यात आला.

  या संदर्भात रिपाइं (आठवले) च्या वतीने  नळदुर्गचे अप्पर तहसिलदार याना निवेदन देण्यात आले असून त्यात म्हाटले की, नुकतच दिल्ली येथे सर्वोच्च न्यायालयातील न्याय दालनात जाऊन जातीयवादी सनातनी मनुवादी नराधमाने  सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भुषण गवई यांच्यावर बुट भिरकावून भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न केला असून त्या भ्याड हल्ला करणाचा प्रयत्न करणाऱ्या नराधमाचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने जाहीर निषेध करण्यात येत असून हा निंदनीय प्रकार म्हणजेच  देशाच्या लोकशाहीवर देशाच्या न्यायव्यवस्थेवर हल्ला करण्याचा प्रयत्न असून या हल्लेखोर प्रवृत्तीच्या नराधमावर 
 देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा  अशी मागणी करण्यात आली आहे. 

सदर निवेदनाची एक प्रत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्याकडेही देण्यात आली आहे. या निवेदनावर रिपाइंचे जिल्हा सचिव एस.के.गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे , तालुका अध्यक्ष अरुण लोखंडे, नळदुर्ग शहराध्यक्ष मारुती खारवे, लहुजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, दलित पॅंथरचे जिल्हा संपर्कप्रमुख शामकांत नागील,रिपाइं तालूका उपाध्यक्ष महादेव कांबळे, रिपाइं अल्पसंख्याक आघाडीचे तालुका अध्यक्ष बाशिद कुरेशी,रिपाइं, राजेंद्र शिंदे, कैलास गवळी गुरुजी,दत्ता कांबळे,जयभिम वाघमारे,धर्मराज देडे, प्रकाश बनसोडे, पप्पू गायकवाड,बाबासाहेब कांबळे, अतुल बनसोडे, पत्रकार ईरफान काझी, विशाल मुकदानसह  कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.
 
Top