नळदुर्ग: नगरपालिका निवडणुक प्रभाग निहाय आरक्षण, अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग क्रं २, ८ आणि १० 

नळदुर्ग,दि.०८ : शिवाजी नाईक 

बुधवार दि.८ ऑक्टोबर रोजी नळदुर्ग नगर परिषद सभागृहात नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे आरक्षण सोडत काढण्यात आली. अनुसूचित जातीसाठी राखीव प्रभाग क्रं २, ८ आणि १० आहेत.

धाराशिव जिल्हा पुनर्वसन अधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी अरुणा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोबतचा कार्यक्रम पार पडला. सदर आरक्षण सोडतीसाठी मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार  यांनी  माहिती दिली. प्रस्ताविक कर निर्धारक व प्रशासकीय अधिकारी पल्लवी पाटील  यांनी केले. सहाय्यक प्रकल्प अधिकारी 
 सुरज गायकवाड , अभियंता समीर मोकाशी, व इतर अधिकारी, कर्मचारी यांनी सहकार्य केले.  सोडतीवेळी  माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, विविध पक्षाचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

प्रभाग व त्यात समावेश असलेला भाग, मतदार संख्या, आरक्षणची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

प्रभाग क्रमांक ०१) वसंतनगर दुर्गानगरमध्ये २ हजार २४ एवढी मतदारांची संख्या आहे. 
येथील आरक्षण अ) नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला  ब ) सर्वसाधारण.
प्रभाग क्र.०२) इंदिरानगर, वैष्णवनगर , व्यासनगर या ठिकाणी २हजार ०६ एवढे मतदार आहेत. अ) अनुसूचित जाती करीता आरक्षीत आहे. ब) सर्वसाधारण महिला करीता आरक्षीत झाले आहे. 
प्रभाग क्रं ०३ ) माऊलीनगर,व्यासनगर, शनिवार वाडा  येथील मतदार १ हजार ७९६ आहेत.
अ) नारीकांचा मागास प्रवर्ग ब) सर्वसाधारण महिला, 
प्रभाग क्रं ०४) ब्राह्मण गल्ली ,गवळी गल्ली, बेडगे गल्ली व मोहम्मद पन्ना गल्ली  येथे १ हजार ७१६   एवढे मतदार आहेत.अ) सर्वसाधारण महिला  ब )सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक ०५) मराठा गल्ली, बोरीघाट, मोहम्मद पन्नाह गल्ली, लोहार गल्ली, पठाण गल्ली व काझी गल्ली याठिकाणी मतदार  १ हजार ७१६  एवढे आहेत. अ) सर्वसाधारण महिला  ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्रं ०६ )  मुलतान गल्ली ,भोई गल्ली व साठेनगर येथे मतदार १ हजार ९९०, अ) नारिकांचा मागासा प्रवर्ग ब )सर्वसाधारण .
प्रभाग क्रं. ०७) कुरेशी गल्ली व इनामदार गल्ली व हत्ती गल्ली  या प्रभागात मतदार १ हजार ६४६ असुन , अ) ना.मा.प्र, ब) सर्वसाधारण महिला.
 प्रभाग क्रं.८) चांभार गल्ली, कासार गल्ली, हत्ती गल्ली व भिमनगर , मतदार १८८६, 
अ )अनुसूचति जाती महिला,   ब ) सर्वसाधारण.
प्रभाग क्रं.०९) भवानीनगर ,प्राध्यापक कॉलनी , व्यकंटेश नगर, माने प्लॉटिंग व रहीम नगर , मतदार १ हजार ९१२, अ) ना.मा.प्र. महिला   ब) सर्वसाधारण.
प्रभाग क्रमांक १०) भिमनगर, बौद्धनगर, मुळे प्लॉटिंग, शिवकरवाडी व रणे प्लॉटिंग , मतदार १६४९ आहेत. अ) अनुसूचित जाती महिला,  ब) सर्वसाधारण.ईत्यादी.
 
Top