तथागत भगवान गौतम बुद्धांचा संदेश आनंद व मानवी कल्याणाकारी : - भन्ते संघानंद
नळदुर्ग येथे धम्म चक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा
नळदुर्ग,दि.०४ :दादासाहेब बनसोडे
आजच्या वेगवान आणि तणावपूर्ण जीवनात बुद्धाचे तत्वज्ञान विशेष प्रासंगिक आहे .त्यांचा अहिंसेचा संदेश पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक सलोख्यासाठी प्रेरणादायी असुन तथागत बुद्धांचा विचार हा शांतीकडे घेऊन जाण्याचा खरा मार्ग आहे .
बुद्ध केवळ बौद्धिक कुतूहल भागवण्यासाठी ते काही बोलले नाहीत. ते व्यावहारिक शिक्षक होते. ज्यामुळे मनुष्याला शांती आणि आनंद मिळेल. त्यांनी बोधी वृक्षाखाली खोल एकाग्रतेने ध्यानाचा सराव केला. बुद्धत्व केवळ निवडक लोकांसाठी किंवा अलौकिक प्राण्यांसाठी राखीव नाही. तर कोणीही बुद्ध होऊ शकते. स्वतःच्या प्रयत्नातून माणूस सर्वोच्च ज्ञाना पर्यंत पोहोचू शकतो. बुद्ध धम्म कोणालाही प्राणी किंवा दैवी प्राणी बनण्यास शिकवत नाही.
बुद्धाने कधीही दुसऱ्या माणसाच्या विचारात स्वतंत्र हस्तक्षेप केला नाही स्वातंत्र्य विचार हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे एखाद्याचा दृष्टिकोन चारित्र्य अध्यात्मिक प्रवर्ती यांचा आदर केला पाहिजे.
बुद्ध स्वतःला एक मानवी शिक्षक मानत होते. ज्यांचा विवेक बुद्धीने विवेक माणसाशी कर्तव्य मानवाच्या आनंद व कल्याणासाठी होतो आणि ज्ञान मिळविण्यासाठी होतो. बुद्धांनी केवळ अंधश्रद्धा आणि सर्व शक्तिमान शक्तीच्या भीतीला पराभव केले अनु उपयुक्त संस्कार आणि मानवी या बाह्य शक्तीच्या प्रभावाखाली येऊ नये प्रार्थना यज्ञ कर्मकांड आणि धार्मिक विधीमुळे मानवाच्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाहीत .यासाठी प्रत्येक मानवाने जनकल्याण व अष्टांगिक मार्गाचा अवलंब व्हावा. तरच समाजातील प्रत्येक प्रत्येक मानवाचे जीवन समृद्ध होईल असे परखड मत सोलापूरचे पूज्य भन्ते सघानंद यांनी केले.
नळदुर्ग शहरात नुकताच धम्मचक्र प्रवर्तन अशोका विजया दशमीचे औचित्य साधून बौद्धांचा प्रसार आणि प्रचारासाठी शहरातून तथागत भगवान गौतम बुद्धाच्या मूर्तीची धम्म रॅली काढण्यात आली. यावेळी धम्म देसना प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी पुज्य भन्ते शासन सुरी व पुज्य भन्ते अंगुलीमाल यांनी ही धम्म देसना दिली.
प्रथमता तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच पुजन नालंदा बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष निवृत्त प्रा शिवाजी बनसोडे , सेक्रेटरी बाबुराव बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. पंचशिल ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी समता सैनिक दलाच्या सैनिकांनी पंचशिल ध्वज व भन्तेना मानवंदना दिली. भन्ते संघानंद भन्ते, शासन सुरी भन्ते अंगलीमाल सर्व उपस्थित बौद्ध उपासक व उपासिकाना त्रिशरण पंचशिल दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब बनसोडे यांनी केले. यावेळी रिपाइंचे सचिव एस के गायकवाड , प्रा नागनाथ गायकवाड , सामाजिक कार्यकर्ते प्रमोद कांबळे आदिनी आपले मनोगत व्यक्त केले . यावेळी माजी सैनिक पद्माकर पुजारी यांचे पुत्र पोलिस निरीक्षक राजकुमार पुजारी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रितकुमार पुजारी , मधुसुदन दुरुगकर , लक्ष्मीताई पुजारी , विद्याताई पुजारी , कोमलताई पुजारी , उषाताई दुरुगकर यांच्यावतीने तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रदिप्त मुर्ती दिले. या मुर्तीची नळदुर्ग शहरातुन धम्मरॅली काढून मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
याप्रसंगी पुजारी परिवाराचा दिवंगत मुख्याध्यापक सदाशिवराव बागडे प्रतिष्ठानच्या वतीने अजयकुमार बागडे यांनी सत्कार केला .व रुपाली मनोजकुमार बनसोडे ही सेट परिक्षा उत्तीर्ण झाल्यामुळे बागडे परिवाराकडून सत्कार करण्यात आला . यावेळी धम्मरॅली कमेटी अध्यक्ष ऋषीकेश कांबळे यांचा ही सत्कार करण्यात आला.
यावेळी डॉ आंबेडकर इंटर नॅशनल इंग्लिश मिडीयमचे स्कुलचे मुख्य प्रवर्तक तथा रिपाइंचे शहराध्यक्ष मारुती खारवे , माजी नगरसेवक किशोर बनसोडे , रिपाइंचे दुर्वास बनसोडे , पत्रकार सुनिल बनसोडे, योगेश सुरवसे, कुमार ढेपे , योगेश दुरुगकर , गणेश दुरुगकर , निवृत्त प्रा भगवान चिमणे , प्रा डॉ पी एस गायकवाड , सचिन कांबळे ,गौतम वाघमारे , सत्याशिल नळदुर्गकर , माजी नगरसेविका विमलताई बनसोडे , सुशिलाताई गायकवाड , राजरत्न बनसोडे , अतुल बनसोडे ,अमर बनसोडे , सह महिला बौद्ध उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार बौध्दाचार्य तथा पत्रकार दादासाहेब बनसोडे यांनी मानले.