परिवहन मंत्री हेच पालकमंत्री असलेल्या धाराशिव जिल्ह्यातील एसटीची वाट बिकट

नळदुर्ग,दि.०४: शिवाजी नाईक 

बस नसल्यामुळे रात्री सात पर्यंत शालेय , महाविद्यालयीन (मुली, मुले) विद्यार्थ्यांसह प्रवासी एस.टी. बस स्थानकात ताटकळले होते. तर उपलब्ध झालेली बस ही निघाली बंद पडकी, ही घटना तुळजापूर आगार अंतर्गत येणाऱ्या नळदुर्ग 
बसस्थानकात पाहायला मिळाली. याप्रकरणी प्रवाशांत उन एस.टी महामंडळाच्या काराभाराबाबत संताप व्यक्त केला जात आहे.

नळदुर्ग शहरातील  एस.टी.बस स्थानकात शुक्रवार दि. ३ ऑक्टोंबर  रोजी सायंकाळी महाविद्यालय व शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांची तोबा गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील असंख्य विद्यार्थी नळदुर्गसह विशेषता अणदुर याठिकाणी शिक्षणासाठी येतात. मात्र एसटी महामंडळाच्या तुळजापूर विभागाकडे कमी बस उपलब्ध असल्याचा फटका ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. सायंकाळी बस उपलब्ध नसल्यामुळे बस स्थानकातील असन (जागा) अपुरी पडत असल्याचे चित्र दिसून आले. 

तुळजापूर येथील यात्रेनिमित्त बहुतांशी बस उपलब्ध नसल्याचे समोर येत असून यामुळे विद्यार्थ्यांची मात्र मोठी गैरसोय होत असल्याचे दिसून आले. परिसरातील होर्टी, मूर्टा, चिकुंद्रा, नंदगाव, लोहगाव, बोळेगाव, हंगरगा,  कुन्सावळी व सिंदगावसह असंख्य वाडी, वस्ती, तांड्यातील विद्यार्थी नळदुर्ग व अणदूरला दररोज एसटी बसने शिक्षणासाठी प्रवास करतात. दरम्यान सायंकाळी सात वाजता बस उपलब्ध झाली. मात्र ती बस कुन्सावळी येथे बंद पडल्याची माहिती मिळाली आहे.
 
Top