आस्थपना विभाग आधिका-याच्या त्रासाला कंटाळुन निवृत्त लिपिकाचा नगरपालिकेसमोर आत्मदहनाचा इशारा

नळदुर्ग,दि.१९: शिवाजी नाईक 

 अस्थापना विभागाकडून दिल्या जाणाऱ्या सततच्या त्रासामुळे वैतागलेल्या नगरपरिषदेचे निवृत्त लिपीक पटेल मुश्ताक नजीर यांनी नळदुर्ग न.प.कार्यालयासमोर येत्या  दि.५ नोव्हेंबर रोजी  आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे  जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

निवेदनात मुश्ताक पटेल यांनी म्हटले  आहे  की, नळदुर्ग नगरपरिषद  कार्यालयातून दि. ३०/ ०६/ २०२५  रोजी सेवानिवृत्त झालो आहे. माझ्या सेवानिवृत्ती नंतरची मिळणारी रक्कम सेवाउपदान, रजा रोखीकरण व एनपीएस मधून मासिक पगारामधून कपात झालेली रक्कम इत्यादी मिळण्याकरीता अस्थापना प्रमूख यांना वेळोवेळी तोंडी विनंती करुन, शासनाचे परिपत्रक देऊनसुद्धा आस्थापना क्र. १ मधील संबंधीत अधिकारी हे मला गेल्या काही दिवसांपासून सतत मानसिक छळ, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे, धमक्या देणे व अन्यायकारक वागणूक देत आहेत.

तरीसुद्धा माझ्या मिळणाऱ्या रक्कमेबाबत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. परिणामी मी प्रचंड मानसिक तणावाखाली असून या अन्यायाविरुद्ध न्याय न मिळाल्यास मी दि. ०५/११/२०२५ रोजी नगर परिषद नळदुर्ग कार्यालयामध्ये आत्मदहन करीत आहे. याप्रकरणी संपूर्ण जबाबदारी पुर्णपणे अस्थापना क्र.१ मधील संबंधीत अधिकाऱ्यावर राहील,  माझ्या घरातील परस्थिती बिकट असून सध्या माझ्या घरी मुलगी आजारी असल्याने व मला बिपीचा त्रास असल्याने औषधोपचाराकरीता माझ्याकडे पुरेशी रक्कम उपलब्ध नाही माझा सर्व उदनिर्वाह याच रक्कमेवर अवलंबून आहे.

 मला मानसिक व शाररिक त्रास देणाऱ्या अस्थापनेच्या अधिकाऱ्यावर कडक कारवाई करुन भविष्यात अन्य कोणावरही वेळ येऊ नये,  यांची गांभीर्याने नोंद घेण्यात यावी, तरी   योग्य न्याय  देण्याची मागणी केली आहे.

सदर प्रकरणातील तपास सुरु करुन संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध शासकीय व फौजदारी कारवाई करण्यात यावी. माझ्यावर करण्यात आलेल्या  अन्याय प्रकरणी संबंधीत अधिकाऱ्यांवर आहे.
निवेदनाची प्रत धाराशिव जिल्हाधिकारी,पोलिस अधिक्षक, तुळजापूर तहसिलदार, न.प. मुख्याधिकारी, पोलिस निरीक्षक आदींना देण्यात आले आहे.
 
Top