नळदुर्ग नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गासाठी ; इच्छुकांचे चेहरे आनंदाने खुलले , बसवराज धरणेसह अनेकांच्या सोशल मीडियावर पोस्ट,
नळदुर्ग,दि.०६ : शिवाजी नाईक
नळदुर्ग नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण होणार याकडे सर्व शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे. मागील कार्यकाळात नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण स्त्रीसाठी आरक्षित होते. त्यामुळे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या रेखा हारिदास जगदाळे हे बहुमताने निवडून आल्या होत्या. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण केल्यानंतर म्हणजे सन २०२१ पासुन आजतागायत नगरपालिकेवर प्रशासक आहे.
दरम्यान सोमवार दि.०६ ऑक्टोंबर रोजी
मुंबईत झालेल्या नगराध्यक्ष सोडतीत नळदुर्ग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. ही निवड जनतेतुन होणार आहे . त्यामुळे सर्वसाधारण पुरुष नगराध्यक्ष कोण होणार ? याची चर्चा रंगली आहे. आता नव्याने झालेल्या आरक्षणामुळे इच्छुक सक्रिय होताना दिसत असुन हालचालींना वेग आला आहे.
नगराध्यक्ष पदाचे हे आहेत प्रमुख दावेदार!
महायुतीकडुन भाजपचे बसवराज धरणे, संजय बताले, महाविकास आघाडीकडून अशोक जगदाळे, सरदारसिंग ठाकूर , हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असल्याची त्यांच्या समर्थकांनी सोशल मिडियावर पोस्ट व्हायरल केल्या आहेत. त्याचबरोबर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यासह इच्छुक अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता असल्याने आगामी निवडणुक रंगतदार होणार याबाबत चर्चेला मोठ्या प्रमाणावर उधाण आले आहे.
नळदुर्ग नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद यांनी भुषविले
काजी अबुजर काजी अयाजोदिन १९५५ ते १९६२, हजारे शितलसिंग मन्नूसिंग १९६२ ते १९६२, पुदाले प्रभाकर बापुराव १९६२ ते १९६६, शेटगार धर्मराव सिद्धप्पा १९६६ ते १९६७, पुदाले प्रभाकर बापुराव १९६७ – १९७९, जहागिरदार रफिक अहमद (प्रभारी) १९७९ - १९७९, पुदाले प्रभाकर बापुराव १९७९ – १९८१, प्रशासकीय कालावधी १९८१ - १९८५ ,पुदाले प्रभाकर बापुराव १९८५ – १९९१, सय्यद खमरअली जाफरअली १९९१ - १९९४, प्रशासकीय कालावधी जायभाये डी बी तहसीलदार १९९४ – १९९४, राठोड देविदास लक्ष्मणराव १९९४ - १९९६ ,सय्यद शब्बीरअली महेमुदअली १९९६ – १९९७, बनसोडे अशोक दादाराव १९९६ – १९९९८,श्रीमती राठोड झिमाबाई देविदासराव १९९८-२००१, कुरेशी हाजी मुश्ताक हाजी अ. गणी २००१ – २००४ ,कोळी. व्ही. एल २००४ – २००४, दासकर दत्तात्रय अंबादासराव २००४ -२००६, जगदाळे उदय अंबादासराव २००६ – २००८, जहागिरदार नय्यर सज्जाद अली (प्रभारी) २००८ – २००९ ,जगदाळे उदय अंबादासराव २००९ – २००९ , जहागिरदार नय्यर सज्जादअली (प्रभारी) २००९ – २००९
जगदाळे उदय अंबादासराव २००९ – २००९, श्रीम. गायकवाड निर्मला अरविंद २००९ - २०११ ,प्रशासकीय कालावधी कोळी. व्ही. एल तहसीलदार २०११ – २०११, कासार नितीन वसंतराव २०११ – २०१३ ,सय्यद शब्बीरअली महेमुदअली २०१३ – २०१३, काजी शहबाज अ.उलुम २०१४ – २०१४ ,श्रीम. सुरवसे मंगल उद्धव २०१४ – २०१५, श्रीम. कुरेशी मुन्वर सुलताना निसार अहेमद २०१५ - २०१६,
श्रीम. जगदाळे रेखा हरिदास २०१६ – २०२१, योगेश खरमाटे प्रशासकीय कालावधी २०२१ – २०२४ ,प्रशासकीय कालावधी २०२४ – २०२५ ईत्यादी.
सन १९५५ ते २०२५ या कालावधीत पाच महिलांना नगरध्यक्षपदाची संधी लाभली. तर ८० वर्षात सात वेळा न.प. वर प्रशासक राहिले असुन सन १९८१-१९८५ या कालावधीत सर्वाधिक काळ म्हणजे ४ वर्ष ३ महिने ८ दिवस प्रशासकीय कालावधी होता. तर दि.२६ डिसेंबर २०२१ रोजी न.प.ची मुदत संपल्याने आज अखेर पर्यंत प्रशासक लागुन ३ वर्ष ९ महिने १२ दिवस झाले आहे.