नळदुर्ग शहरामध्ये ९५० आक्षेप फेटाळले. सर्वात मोठा प्रभाग क्रमांक ०२ तर कमी मतदार असलेल्या प्रभाग ०३
नळदुर्ग, दि.०३:
नगर पालिकेच्या प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादीवर आक्षेप व सुनावणीनंतर अखेर अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली. १७ हजार १२२ मतदार आहेत.
नळदुर्गकरांकडून एकूण अ व ब अर्ज मिळून ०३ हजार ६६ आक्षेप नोंदवण्यात आले होते. यापैकी एक हजार ५३२ आक्षेप अर्ज मान्य करण्यात आले तर ९४७ आक्षेप अमान्य करण्यात आले. आक्षेप घेण्यामध्ये दुबार नोंदणी, मतदार रहात असलेला प्रभाग वेगळा तर यादी मधील नाव दुसऱ्या प्रभागात येणे आदी कारणांमुळे आक्षेप नोंदवले गेले.
अक्षेप नोंदवल्यानंतर अर्ज 'अ' साठी नगरपालिकेकडून स्थळ पाहणी व निर्णय घेण्यात आला तर अर्ज 'ब' साठी मात्र नोटीस, चौकशी नंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर अंतिम मतदार यादी तयार करण्यात आली.
नळदुर्ग नगरपालिकेत प्रभागाची संख्या दहा झाली तर लोकप्रतिनिधींची संख्या वीस वर आली आहे.
प्रभाग दोन मधील उमेदवारांना घ्यावे लागणार जास्त कष्ट तर प्रभाग तीन मध्ये मतदार कमी असल्यामुळे उमेदवारांची धावपळ होणार कमी.
नळदुर्ग नगरपालिकेच्या अंतिम मतदार यादीनुसार १७ हजार १२२ मतदार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या आठ हजार ३८४ एवढी तर पुरुष मतदारांची संख्या आठ हजार ७३६ एवढी आहे. सर्वाधिक मतदार प्रभाग क्रमांक दोन मध्ये २ हजार ११ तर सर्वात कमी मतदार प्रभाग क्रमांक तीन मध्ये एक हजार २९१ आहेत. प्रभाग क्रमांक चार, पाच व आठ मध्ये
पुरुष मतदारांपेक्षा स्त्री मतदारांची संख्या जास्त आहे.
प्रभाग क्र. -पुरुष -स्त्री- एकूण मतदार
१- ८७०- ७९८ -१६६८
२ -१०३५- ९७६ -२०११
३ -६५१ -६४० -१२९१
४ -६७२ -७२६ -१३९८
५ -८७५ -९१६ -१७९१
६ -९९७ ९७७- १९७४
७ -९८३- ८७२ -१८५५
८ -७३७ -७७० -१५०७
९- ९२० -७९२ -१७१२
१०- ९९६ -९१७ -१९१३