दांडपट्टा स्पर्धेत केसर जवळगा शाळेचा यशस्वी झेंडा!
मुरूम,दि.१२:
सातारा जिल्ह्यातील वाई-वाठार येथे दिनांक ८ व ९ नोव्हेंबर २०२५ रोजी पार पडलेल्या द्वितीय राज्यस्तरीय दांडपट्टा अजिंक्यपद क्रीडा स्पर्धेत धाराशिव जिल्ह्याचा अभिमान वाढवणारा गौरवशाली क्षण घडला.धाराशिव जिल्ह्यातील केसरजवळगा येथील पीएमश्री जिल्हा परिषदेची केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विद्यार्थिनीं कु. दीपिका ख्यामलिंग घोडके व कु. रूपाली शाहुराज गायकवाड या दोघींनी उत्कृष्ट कामगिरी करत कांस्य पदक मिळवला आहे .यामुळे धाराशिव जिल्हा राज्यात कौतुकास्पद ठरले आहे.
शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संदीप पाटील, उपाध्यक्ष अजीज शेख, माजी अध्यक्ष दत्ता घोडके, तसेच लोकेश पाटील, शुभम कांबळे, शिरीष पाटील आदी मान्यवरांनी विद्यार्थिनींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. याच कार्यक्रमात हणमंत पाटील (माजी सैनिक तथा नवनियुक्त पोलीस कर्मचारी) यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रमुख मु.अ. बालाजी भोसले,सहशिक्षक सुनिल राठोड, संजीव भोसले, साधना ताशी, गजानन खमीतकर, अनंत वाघमोडे, सुंकेवर सर, कुन्हाळे सर, तसेच युवा प्रशिक्षणार्थी वैभव पाटील यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बालाजी भोसले तर आभार सुनिल राठोड यांनी मानले