मनसेच्या प्रमोद कुलकर्णी यांचा राजीनामा,पत्रात वरिष्ठावर केली नाराजी व्यक्त

नळदुर्ग,दि.१२:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते  प्रमोद कुलकर्णी यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर आपला शहर  सरचिटणीस  पदाचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असून त्यांनी मनसेच्या माध्यमातून शहरातील शेकडो नागरी प्रश्न प्रशासनासमोर मांडुन अनेक विषय मार्गी लावून आपले स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करत राजकारणात आपले वेगळे स्थान निर्माण केल्याचे सर्वश्रुत आहे.

 नळदुर्ग व परिसरात  कुलकर्णी यांचा मोठा जनसंपर्क  आहे. स्ट्रीट लाईट,उपजिल्हा रुग्णालय, शौचालय अनुदान,रस्ते, नियोजित नळदुर्ग तालुका, महामार्गावरील टोलचा विषयासह  अनेक विषय त्यांनी लावून धरत प्रशासनावर मनसेची जरब बसवली. प्रमोद कुलकर्णी यांचा सर्व राजकीय,सामाजिक क्षेत्र ,प्रशासनातील अधिकारी,पत्रकार,सर्व धर्मीय नागरिक यांच्याशी सलोख्याचे संबंध आहेत,त्यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीमुळे मनसेचे नाव शहरात काम करण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे,परंतु हे करत असताना गेल्या अनेक महिन्यापासून पक्ष संघटनेत फेरबदल करावेत,अशी मागणी कुलकर्णी यांनी पक्षाच्या वरिष्ठाकडे केल्याचे सांगितले.

मात्र गेल्या तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पद रिक्त असल्यामुळे काम करत असताना अनेक अडचणी येत असताना त्यावर मात करत कार्य सुरूच ठेवले होते. पक्ष संघटनेत तात्काळ बदल झाले पाहिजे ही आगृही भूमिका कुलकर्णी यांनी घेतल्यामुळे वरिष्ठ नेत्यांनी अद्याप पर्यंत कोणतेही आदेश दिले नसल्याने प्रमोद कुलकर्णी यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलताना सांगितले आहे.
 
Top