राजकीय वारसा लाभलेल्या प्रतिष्ठित जैनधर्मिय शेटगार घराण्याची शिक्षित सुन नगरपालिका निवडणुक भाजपकडून लढवणार?
नळदुर्ग शहरातील जैन समाजाचे प्रतिष्ठित घराणे असलेल्या व १९६५ साली राजकीय वाटचालीत सहभाग घेतलेल्या धर्मराव शेटगार यांच्या स्नुषा नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत उतरणार आहे.त्या भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढविणार असुन विजयाच्या प्रबळ दावेदार असल्याची नागरिकात रंगली चर्चा.
नळदुर्ग नगरपालिकेच्या राजकीय वर्तुळात प्रतिष्ठित म्हणून संबोधले जाणारे चौथे
दिवंगत नगराध्यक्ष शेटगार धर्मराव सिद्धप्पा यांची स्नुषा सौ आशालता बाहुबली शेटगार ह्या भाजपकडून शहरातील वार्ड क्र ४ मधुन निवडणुक लढविण्यास इच्छुक आहेत.
सौ आशालता शेटगार यांचा महिला भगिनीशी संपर्क आहे.धार्मिक व सामाजिक कार्यात त्या अग्रेसर असुन लाडक्या बहिणी आपल्या पाठिशी असुन केवळ प्रभागातील नागरिकांना मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच विकासाला चालना देणार आहे.त्यामुळे मला विजायाची खात्री असल्यानेच निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.
वैजिनाथ व दर्शन बाहुबली शेटगार यांचा शहरातील सर्व समाजातील नागरिकाशी संपर्क चांगला असुन गोरं गरीबांच्या अडी अडचणी सोडविण्यासाठी धावुन जातात.त्याचबरोबर सामाजिक कार्यातही नेहमी पुढे येतात.
नळदुर्ग येथील ब्राह्मण गल्ली, जैन गल्ली, गवळी गल्ली, बेडगे गल्ली व मोहम्मद पन्नाह गल्ली हा भाग प्रभाग क्रमांक ०४ मध्ये समाविष्ट आहे.येथील एक जागा सर्व साधारण महिलेकरिता आहे. प्रभाग क्रमांक ४ चे मतदान धरित्री विद्यालयामध्ये असुन उत्तर बाजू खोली क्रमांक एक मध्ये मतदान केंद्र क्रं ४/१ याठिकाणी ६९९ मतदार तर याच ठिकाणी खोली क्रमांक दोनमध्ये मतदान क्रं ४/२ असुन ६९९ मतदार आहेत.