भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ते धिमाजी घुगे सपत्नीक प्रभाग नऊचे प्रबळ दावेदार  

नळदुर्ग,दि.१३:

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्यासाठी सतत दिवस रात्र हजर राहणारा भारतीय जनता पार्टीचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणुन नळदुर्ग परिसरात परिचित असणारे धिमाजी सुधाकर घुगे व त्यांच्या सुविधा पत्नी सौ.सुनिता धिमाजी घुगे या दाम्पत्यासह भाजपचे कार्यकर्ते अजय देशपांडे नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ०९ मधुन नगरसेवक पदाचे प्रबळ दावेदार असल्याची चर्चा नागरिकातुन रंगली आहे.

भारतीय जनता पार्टीचे जुन्या फळीतील माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, अँड मिलिंद पाटील, तत्कालीन जीप सदस्य कोंडाप्पा कोरे, दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्ते विरेशाप्पा डोंबे, गोपाळ देशपांडे यांच्यासमवेत अन्य कार्यकर्तेसह उल्लेखनीय कार्य केल्याचे सर्वश्रुत आहे.

धिमाजी घुगे हे गेल्या ३५ वर्षापासून भारतीय जनता पार्टीचे निष्ठावान कार्यकर्ता म्हणून कार्य करीत आहेत. याकामी त्यांना पत्नी सुनिता यांची सदैव साथ लाभल्याचे त्यांनी सांगितले.
त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पासून कार्यास सुरुवात केले. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारी म्हणून यशस्वी कामगिरी पार पाडली आहे. त्यानंतर विविध पदावर त्यांनी प्रामाणिकपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन पक्षश्रेष्ठींनी भाजपच्या नळदुर्ग शहराध्यक्षपदी सलग  दोन वेळा निवड  केली . ते सध्या आयुष्यमान भारत नळदुर्ग मंडळ प्रमुख म्हणून या पदावर कार्यरत आहेत. 

त्यांनी कोरोना काळात मोलाचे योगदान दिले आहे त्यापूर्वी 1993 सालच्या भूकंपात मोठे कार्य केले आहे.ते धार्मिक कार्यास सढळ हाताने मदत करतात. तर सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार असतो.विकासात्मक कामासाठी व सर्वसामान्याचे प्रश्न सोडविण्यासाठी कुठेही ,कधीही स्वखर्चाने हजर राहुन, हाकेला धावून येणारा धिमाजी घुगे युवकांना , नागरिकांना आपलेसे वाटणारा आहे.

सौ.सुनिता घुगे यांनी शिवणक्लासच्या माध्यमातून महिला व लाडक्या बहिणीमध्ये लोकप्रिय आहेत. भवानीनगर ,प्राध्यापक कॉलनी, व्यकंटेशनगर, ठाकरे नगर, माने प्लॉटिंग रामलीला नगर या प्रभाग नऊमध्ये त्यांचा संपर्क आहे. प्रभाग नऊ हा ओबीसी महिला, सर्व साधारण पुरुषासाठी असल्याने भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात असल्याची चर्चा होत आहे.

त्याचबरोबर भाजपचे गोपाळ देशपांडे यांचे बंधू अजय देशपांडे हे पण भारतीय जनता पार्टी कडून निवडणुकीसाठी इच्छुक आहेत. गेल्या 20 वर्षापासून भाजपचे सक्रिय कार्यकर्ते आहेत युवा मोर्चाचेही त्यांनी काम केले आहे. शहरातील प्रतिष्ठित व्यापारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत.
 
Top