स्वकर्तृत्वाने नळदुर्ग नगरीत आगळे वेगळे स्थान निर्माण करणा-या प्रमोद कुलकर्णी यांच्या सौभाग्यवती विजया  कुलकर्णी निवडणुकीच्या रिंगणात

नळदुर्ग,दि.१३:

 राजकीय क्षेत्रात प्रमोद कुलकर्णी यांनी स्वकर्तृत्वाने आपले स्थान निर्माण केले असून,त्यांची कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना शहरातील व प्रभागातील अनेक विषय मार्गी लावून दाखवले आहेत, उपजिल्हा रुग्णालय,अपर तहसील,महावितरणचे उपविभागीय कार्यालय सुरु होण्यासाठी केलेला पाठपुरावा,नळदुर्ग तालुका निर्मितीसाठी केलेला पाठपुरावा,शहरातील शौचालय योजनेच्या बाराशे लाभार्थीना पालिकेकडून प्रत्येकी 3 हजार रु प्रमाणे 36 लाख रु प्रोत्साहन अनुदान वाटप करण्यास भाग पाडले,गोलाई ते बसस्थानक पर्यंत  स्ट्रीटलाईट उभे राहण्यासाठी त्यांची महत्वाची भूमिका होती,

अनेक आंदोलन,मोर्चे,उपोषण,निवेदन यांच्या माध्यमातून अनेक नागरी प्रश्न प्रशासनासमोर मांडले व  अनेक विषय मार्गी लावून दाखवले,याच कामाच्या जोरावर व विकासाच्या मुद्यावर प्रमोद कुलकर्णी हे त्यांच्या सुविधा पत्नी 
विजया प्रमोद कुलकर्णी यांस प्रभाग क्रमांक ४ मधून सर्वसाधारण महिला या जागेसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार आहेत,
प्रमोद कुलकर्णी यांचेकार्य, जनसंपर्क, प्रशासनातील अधिकारी व सर्व राजकीय, सामाजिक क्षेत्राशी व सर्वधर्मीय नागरिकांशी सलोख्याचे संबंध आहेत. नागरिकांनी कामाची पावती म्हणून एकवेळा नगरपालिका सभागृहात काम करण्याची संधी द्यावी असे आवाहन सौ.विजया प्रमोद कुलकर्णी यांनी  केले आहे.
 
Top