नळदुर्ग नगरपालिका निवडणूक चौथ्या दिवशी नगरसेवक पदासाठी एक उमेदवारी अर्ज दाखल
नळदुर्ग,दि.१३: शिवाजी नाईक
नगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी एका महिलेचा गुरुवार दि.१३ नोव्हेंबर रोजी एक उमेदवारी अर्ज नगरपालिकेत दाखल झाल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर यांनी दिली.
श्रीमती मिनाक्षी तानाजी काळे प्रभाग क्रमांक ३ ब मधुन भारतीय जनता पक्षाकडुन उमेदवारी अर्ज दि.१३ नोव्हेंबर रोजी दाखल केले आहे.
निवडणुक जाहिर झाल्यानंतर दि.१० नोव्हेंबर रोजीपासुन उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाले असुन गेले तीन दिवस कोणताही अर्ज दाखल झाला नसल्याने दाखल अर्ज संख्या निरंक असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिका-यानी दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत दि. १७ नोव्हेंबर रोजी आहे.तर अर्जाची छाननी तारीख दि.१८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्ज माघार घेण्याची दि. २१ नोव्हेंबर रोजी शेवटचा दिवस आहे. त्याचबरोबर अपील नसलेल्या ठिकाणी अंतिम मुदत २५ नोव्हेंबर असुन उमेदवाराना निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी जाहीर दि. २६ नोव्हेंबर रोजी होणार आहे. तर दि. २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान होवुन दुस-या दिवशी म्हणजे दि.३ डिसेंबर २०२५ रोजी मतमोजणी होवुन निकाल जाहीर करण्यात येईल.
_________________________________
📍जाहिरात 📍
♦️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस, नळदुर्ग♦️
आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.
नितीन कुलकर्णी
मो.8983828184