आम आदमी पार्टी (आप) नगराध्यक्ष पदासह 20 जागेसाठी उमेदवार देणार! ईच्छुकांनी संपर्क साधण्याचे वसीम पठाणचे आवाहन
नळदुर्ग,दि.१४:
नगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टी
(आप) नगराध्यक्ष पदासह 20 जागेसाठी (नगरसेवक पद) निवडणूक लढविणार असून तीन ते चार राजकीय पक्षाबरोबर युती करण्यासंदर्भात चर्चा अंतिम टप्प्यात सुरू असल्याची माहिती पक्षाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष वसीम खान पठाण यांनी बोलताना सांगितले. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मोठी चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे.
नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत नवे राजकीय समीकरण तयार होण्याची शक्यता निर्माण झाली असून आप पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टी (आप) निवडणुकीसाठीचंग बांधले आहे. यापुर्वी धाराशिव येथे आम आदमी पार्टीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत नळदुर्ग शहराच्या विकासावर चर्चा करण्यात आली तसेच नळदुर्ग नगरपरिषदेची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला.
आदमी पार्टीनेही रणसंग्रामात उडी घेतल्याने स्थानिक राजकारणात उत्सुकता निर्माण झाली आहे.या निवडणुकीत पक्षाच्या वतीने वीस नगरसेवक जागांवर उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, नगराध्यक्ष पदासाठी देखील आम आदमी पक्षाचा उमेदवार लढविणार आहे, अशी अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याची जबाबदारी धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष वसीम पठाण यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे संपूर्ण निवडणुकीचे नियोजन, प्रचार मोहीम आणि उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्याची जबाबदारीदेखील त्यांच्यावर देण्यात आली आहे."
वसीम पठाण यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की,"नळदुर्ग शहराचा विकास थांबलेला आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर कोणताही पक्ष गांभीर्याने काम करत नाही. आम आदमी पार्टी या निवडणुकीत जनतेच्या हक्कासाठी लढणार आहे.” इच्छुक उमेदवारानी निवडणूकीबाबत पक्षाचे धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष वसीम पठाण यांच्याशी (8446238786) संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.