माजी नगराध्यक्ष मंगलताई सुरवसे यांना काँग्रेस पक्षाची उमेदवारी जवळपास निश्चित?; चौथ्यांदा नगरपालिका निवडणूक मैदान गाजवुन विजयाची  हॅटट्रिक साधण्याचा निर्धार !

नळदुर्ग,दि.१४: शिवाजी नाईक 

गेल्या ३० ते ३५ वर्षापासुन काँग्रेस पक्षाच्या एकनिष्ठ कार्यकर्त्या असलेल्या  माजी नगराध्यक्षा सौ.मंगलताई उध्दव सुरवसे ह्या नळदुर्ग नगरपालिका निवडणूक रिंगणात उतरले आहेत. शहरातील प्रभाग क्रमांक ०९ हा ओबीसी महिलासाठी राखीव असुन या जागेसाठी काँग्रेस पक्षाकडून सुरवसे यांना जवळपास
उमेदवारी  निश्चित मानली जात आहे.

यापुर्वीही सौ.मंगलताई सुरवसे यांनी शहरातील वेगवेगळ्या प्रभागातून नगरपालिकेची तीन वेळा निवडणुक लढवुन दणदणीत विजय मिळविले असुन ते चौथ्यांदा निवडणुक लढविण्याची जोरदार तयारी केल्याचे बोलताना सांगितले. त्याचबरोबर गेल्या तीन दशकापूर्वीपासून राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. सन 2017 मध्ये पहिल्यांदा नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. नगराध्यक्षाच्या कालावधीत त्यांनी नळदुर्ग शहरांच्या सर्वांगीण विकास साधण्याचा प्रयत्न केला असल्याची सर्वश्रूत आहे. शहरात विविध ठिकाणी सभागृह, अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, दिवाबत्ती व शहर स्वच्छतेला त्यांनी प्राधान्य दिले होते.

सुरवसे ह्या काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील तीस वर्षापासून एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून ओळखल्या जातात पक्षाच्या पडत्या काळात अनेकांनी पक्ष सोडून गेले. परंतु त्यांनी पक्षात एकनिष्ठ राहिले आहे. त्यांनी केलेल्या विकास कामाच्या जोरावर व एकनिष्ठ ते मुळेच त्यांना प्रभाग क्रमांक 9 मधन
 त्यांचा विजय निश्चित मानले जात आहे त्याचबरोबर या प्रभागातून त्यांना वाटता पाठीमागे मिळत असून काँग्रेस पक्ष शैक्षणिक यांच्या उमेदवारासाठी हिरवा कंदील दाखविल्याचे समजते. 

याकामी त्यांचे चिरंजीव संदीप उद्धव सुरवसे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे . त्याची दखल घेऊन  काँग्रेस पक्षश्रेष्ठीने संदीप सुरवसे यांना  तुळजापूर तालुका उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे. तर श्री अंबाबाई देवस्थान जिर्णोध्दार समिती सदस्य म्हणून धार्मिक क्षेत्रात त्यांचे योगदान आहे. नळदुर्ग शहर नाभिक समाजाचे अध्यक्ष या पदावर संदीप सुरवसे आहेत.

 
Top