गोरक्षक तथा सकल हिंदु समाजाचे पैलवान विजयसिंह ठाकूर निवडणूक आखाड्यात उतरणार

नळदुर्ग,दि.१० :

सामाजिक कार्यकर्ते,युवकांची क्रेझ असलेल्या व गोरक्षक तथा सकल हिंदु समाजाचे पैलवान विजयसिंह ठाकूर हे नगरपालिका निवडणूक आखाड्यात उतरणार असुन नळदुर्ग शहरातील प्रभाग  क्रमांक ८ ( एकुण मतदार १ हजार ५०७ ) मधून विजयसिंह ठाकूर यांच्या नावाची नागरिकात जोरदार चर्चा होत आहे.

नळदुर्ग शहरात निवडणुकीचे  सर्वत्र किस्से, चर्चाना ऊत आला आहे. त्यापैकी  प्रभाग क्रमांक ८ मधून पैलवान विजयसिंह ठाकूर यांच्या नावाची  जोरदार चर्चा होत आहे. विजयसिंह ठाकूर हे सकल हिंदू समाजाच्या माध्यमातून शहरात कार्य करीत असल्याचे सर्वश्रुत असुन त्यांना मानणारा युवा वर्गही मोठा आहे. प्रत्येक हिंदू तरुणांच्या व लोकांच्या अडचणीवेळी ते धावून जात असल्याने हामखास अडचणी वेळी त्यांची आठवण काढली जाते.. प्रत्येक हिंदूच्या कार्यक्रमात ते स्वतः जातीने उपस्थित राहुन कार्य  पार पाडताना  दिसुन येतात. 

नळदुर्ग शहरात विखुरलेल्या हिंदू समाजातील तरुणांना संघटित करण्याचे कार्य ते करत आहेत. या केलेल्या कार्याच्या माध्यमातून त्यांच्या नावाची चर्चा नागरिकात सुरू आहे. तसेच त्यांना दोन राजकीय पक्षाकडून निवडणूक लढविण्याकरिता विचारपूस केली जात असल्याचे समजते. सकल हिंदू समाजाचे कार्य करत असताना ते सामाजिक कार्यातही नेहमी पुढाकार घेतात. प्रभाग क्रमांक ८ मधील शास्त्री चौक, हत्ती गल्ली, भिमनगर आदी भागात त्यांना मानणारा वर्गही असल्याचे बोलले जात आहे. 


✴️ पैलवान विजयसिंह ठाकूर  हे निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे सांगून 
जनतेच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी व समाजातील अंतिम घटकाच्या लोकांपर्यंत विकास पोहचविण्यासाठी, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व राजकारण हे फक्त विकास करण्यासाठी केले जाते, हे समाजाला दाखविण्यासाठी मी निवडणुकीच्या आखाड्यात उतरत असल्याचे त्यांनी बोलताना सांगितले.✴️

📍जाहिरात 📍 
♦️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस, नळदुर्ग♦️
आमच्याकडे  सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.

नितीन कुलकर्णी 
मो.8983828184
 
Top