राजकीय वारसा जोपासणा-या राजपुत समाजाच्या श्रीमती निर्मला हजारे , श्रीमती सुमन ठाकुर भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यास उत्सुक
नळदुर्ग दि. १० :
६० वर्षांपूर्वी नळदुर्ग नगरपरिषदेच्या माध्यमातून राजपुत समाजाचे हजारे शितलसिंग मन्नूसिंग हे पहिले नगराध्यक्षपद भुषविणारे व राजकीय कारकीर्द यशस्वी केल्याची माहितीला सध्या होऊ घातलेल्या न.प.निवडणुकीच्या अनुषंगाने नागरिकातुन उजाळा मिळत आहे. सध्या होणा-या पालिकेच्या निवडणुक रिंगणात दिवंगत तत्कालीन नगराध्यक्ष हजारे यांच्या स्नुषा श्रीमती
निर्मला सुनिलसिंग हजारे , तर राजपूत समाजाच्या श्रीमती सुमन ठाकुर ह्या महिला भगिनींनी भारतीय जनता पार्टीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक असुन याबाबत भाजप पक्षश्रेष्ठीकडे उमेदवारी मिळण्यासाठी अग्रह करणार असल्याचे म्हटले आहे.
नळदुर्ग नगरपालिकेच्या निवडणुकीत राजपुत समाजाच्या वतीने भाजपकडे प्रभाग क्र. २ आणि प्रभाग क्र. ३ मधुन महिलांसाठी राखीव असणाऱ्या जागेवर समाजातील महिलांना उमेदवारी मागितली आहे. याबाबत लवकरच राजपुत समाजाचे शिष्ठमंडळ आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची भेट घेणार असल्याचे म्हटले आहे.
नळदुर्ग शहरातील राजकारणात राजपुत समाज सहभागी आहे. राजपुत समाजाचे शितलसिंह हजारे यांनी नगराध्यक्ष म्हणुन तर अनिल हजारे आणि सुधीर हजारे हे नगरसेवक म्हणुन काम केले आहे. यावेळी नगरपालिका निवडणुकीत राजपूत समाजाने प्रभाग क्र. २ मधुन भाजपकडुन सुमन ठाकुर यांना तर प्रभाग क्र. ३ मधुन निर्मला सुनिलसिंग हजारे यांना भाजपने उमेदवारी द्यावी अशी मागणी केली जात आहे. या दोनही जागा महिलांसाठी राखीव आहेत.
लवकरच उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु होत असुन निवडणुक लढविण्यासाठी जे इच्छुक उमेदवार आहेत. त्यांनी विविध पक्षांकडुन उमेदवारी मिळाविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. शहरातील राजपुत समाजानेही भाजपकडे समाजाच्या दोन महिलांना उमेदवारी मागितली आहे. सुमन ठाकुर आणि निर्मला सुनिलसिंग हजारे या दोन्ही महिला सामाजिक कार्यात अग्रेसर असुन भाजपने यांना उमेदवारी दिली तर निश्चितपणे या निवडणुकीत भाजपला याचा फायदा होऊ शकतो.
♦️ जाहिरात ♦️
श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस,नळदुर्ग
आमच्याकडे सर्व प्रकारचे नवीन व रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल.
श्री नितीन कुलकर्णी
मो.8983828184