नळदुर्ग,दि.१० :

नळदुर्ग नगरपालिका होत असलेल्या निवडणुकीत प्रभाग क्रं.४ ( ब्राह्मण गल्ली ,गवळी गल्ली, बेडगे गल्ली व मोहम्मद पन्ना गल्ली ) मधुन  भारतीय जनता पक्षाकडून माजी उपनगराध्यक्षा सुप्रिया सुधीर पुराणिक नगरसेवक पदासाठी निवडणुक लढविण्यास ईच्छुक आहेत.या प्रभागात १  हजार ३९८ एवढे मतदार आहेत.

सुप्रिया सुधीर पुराणिक  ह्या सन 2011 मध्ये प्रथम नगरसेविका म्हणून दणदणीत निवडून आल्या.  त्यावेळी निवडणुक त्यांनी  प्रभाग दोन मधून लढविल्या होत्या . त्यानंतर म्हणजे गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत तो प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांनी निवडणूक लढवली नाही. सध्या होऊ घातलेल्या नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक चार हा सर्व साधारण महिलेसाठी झाल्याने पुराणिक भारतीय जनता पार्टी कडून  निवडणूक लढवण्यासाठीते  इच्छुक आहेत.

सन २०१४ मध्ये त्यांची अविरोध उपनगराध्यक्षपदी निवड करण्यात आली.त्यानंतर त्यांनी प्रभारी नगराध्यक्ष म्हणून कांही कालावधी कामकाज  केले आहे. प्रभारी नगराध्यक्षांच्या कालावधीत सुप्रिया पुराणिक यांनी  सुस्त पालीका प्रशासनाला क्रियाशील करुन  रखडत पडलेली शहरातील विविध विकास कामे धडाडीचे  निर्णय घेवुन सुरु केल्याचे सर्वश्रुत आहेच. त्यांनी शहराचा प्रामाणिकपणे विकास करण्याचा प्रयत्न केल्याची नागरिकात चर्चा होत आहे. पुराणिक यांना भाजपकडून उमेदवारी मिळाल्यास त्यांनी विजयाची हमी दिली आहे.

 🔶 जाहिरात 🔶


  🏵️श्री कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस,नळदुर्ग🏵️

  आमच्याकडे  सर्व प्रकारचे नवीन व   रीफब्रिशड कॉम्प्युटर व लॅपटॉप योग्य दरात भेटेल

मो.8983828184

प्रो.श्री नितीन कुलकर्णी ,नळदुर्ग 

 
Top