पावणे पाच किलो सोने, सव्वा दोन लाखांची रोकड असे २ कोटी ६३ लाखाचा मुद्देमाल बँक तिजोरीतुन चोरी ; लिपिकासह तीन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल
नळदुर्ग,दि.०९ :
बँकेच्या कर्मचाऱ्यांने इतर अज्ञात तीन ते चार साथीदारासह सांगणमत करुन बँकेतील तिजोरीवर हात साफ केले . या चोरीच्या घटनेत पावणे पाच किलो सोने, जवळपास सव्वा दोन लाखांची रोकड असे मिळुन २ कोटी ६३ लाखा पेक्षा अधिकचा मुद्देमाल चोरुन नेल्याप्रकरणी बँकेच्या लिपिकासह तीन ते चार जणांविरुद्ध शाखा व्यवस्थापकाच्या तक्रारी वरुन नळदुर्ग पोलिसात रविवारी पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुक्रवार दि.7 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 06. वाजता ते दि. 08 नोव्हेंबर रोजी रात्री 2. वाजण्याच्या दरम्यान दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, धाराशिव, शाखा नळदुर्ग या शाखेतील लिपीक आरोपी राहुल राजेंद्र जाधव, रा. नळदुर्ग याने त्याच्या पदाचा दुरुपयोग करुन त्याचा मित्र सुशिल राठोड, रा नळदुर्ग, पतसंस्थेत प्रवेश केलेला अन्य आरोपी अनोळखी इसम तसेच इतर अनोळखी इसमांसोबत मिळून आपसात कट रचून शाखेच्या मुख्य शटरचे लॉक चावीने उघडून आत प्रवेश केले. आतमधील तिजोरीतील एकूण 263 कर्जदारांचे 2 कोटी 61 लाख 42 हजार 27 रुपयेचे कर्ज रकमेसाठी तारण ठेवलेले 4 किलो 762 ग्रॅम 679 मिली वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2 लाख 23 हजार 737 रुपये पैकी 2,21,245/- रुपये असे एकूण 2,63,63,272/- (दोन कोटी त्रेसष्ट लाख त्रेसष्ट हजार दोनशे बहात्तर रुपये ) रुपयांचा मुद्देमाल संगणमताने चोरुन नेल्याची फिर्यादी उमेश भानुदास जाधव, वय 44 वर्षे, व्यवसाय शाखा व्यवस्थापक (दिशा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,धाराशिव, शाखा नळदुर्ग), यांनी नळदुर्ग पोलिस ठाण्यात दिल्यावरुन वरील आरोपींविरुद्ध गुरन गु.र.न.398/2025 कलम-316(5),331 (4),305, 61 (2),3 (5) बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार हे करीत आहे.