विकासाच्या सोबत जायचं की मागील काळात केलेल्या भकास कारभार, याचा विचार करून मतदान करण्याचे आ.पाटील यांचे आवाहन
नळदुर्ग,दि.०१:
नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीसाठी चारित्र्य संपन्न उमेदवार दिले असुन जनतेनी ठरवायचे विकासाच्या सोबत जायचं की मागील काळात केलेल्या भकास कारभार, यातून कोणाला निवडणार हे तुम्ही ठरवा. पाणी पुरवठा, रस्ते गटारी ,पथदिवे, महापुरुषाचे स्मारक असे विकासाचे कामे चालू आहे. कोणत्याही अमिषाला बळी न पडता भाजपच्या पाठीशी जनतेने उभे राहवे असे आवाहन आमदार राणाजगजितसिंह पाटील यानी केले.
रविवार दि.३० रोजी भाजप - शिंदे शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ नळदुर्ग शहरातील भवानी चौकात आयोजित सभेत आमदार पाटील हे बोलत होते. यावेळी भजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले की, तरुण चेहऱ्याला भाजपने संधी दिली असून या संधीचे सोनं करण्याची संधी नळदुर्गकरना मिळाली आहे. विकास कामे चालू आहे. पुढे चालू राहतील आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून निधीची कमतरता भासू देणार नाही. येणाऱ्या काळात नळदुर्ग शहराचे रुपडे या विकासाच्या माध्यमातून बदलणार आहे. सर्व उमेदवारांना विजयी करण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना नितीन काळे यांनी विरोधकांवर टीका करून एकच हशा पिकविला व भाजप धार्मिकतेच्या नावाखाली बदनाम करण्याचे षड्यंत्र विरोधक करत आहेत त्याना आमचे एकच सांगणे आहे की, भारतीय जनता पार्टी तथा नरेंद्र मोदी याच्यावर सर्वच जाती धर्माचा विश्वास असून प्रत्येक नागरिकांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून असेच विकासाचे कोणतेही व्हिजन आणि मागील पाच वर्षांच्या काळात नळदुर्ग शहराचा केलेला भकास या गोष्टी त्यांना माहीत आहे. भारतीय जनता पार्टी कुठल्याही धर्म ,जात ,पात न पाहता सर्व सामान्यांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी निवडणूक लढवत आहे . याप्रसंगी बसवराज धरणे,नय्यर जहागीरदार, शिवाजी गायकवाड, सुनील उकंडे, विनायक अहंकारी , दत्तात्रय दासकर, ज्ञानेश्वर घोडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सर्व प्रभागातील उमेदवार व उमेदवार उपस्थित होते.