विरोधक मतविभागणी करीत असुन खासदार निधीतुन नळदुर्गचा विकास करु - खासदार इम्रान प्रतापगढी
नळदुर्ग, दि.०१ :
माझ्या खासदार निधीतून शिक्षण,आरोग्य आणि इतर विकास कामासाठी मी निधी देईन,आज प्रत्येकजण शिक्षण घेणे काळाची गरज बनली आहे.समाज शिकला तर आपल्या गावची,देशाची उन्नती साधायची असेल तर शिक्षण हा एकमेव पर्याय आहे. कांही नवख्या पक्षाचे उमेदवार उभे करुन विरोधक मतविभागणी करीत आसुन मतदान करताना विचार पुर्वक करण्याचे आवाहन खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केले.
नळदुर्ग नगरपालिका निवडणूकीत काँग्रेस-ठकरे शिवसेना नगरध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभा रविवार दि.३० रोजी सायंकाळी किल्ला गेट येथे आयोजित करण्यात आली होती देशात "नफरत छोडो भारत जोडो" हा नारा काँग्रेसचा आहे,हा नारा राहुल गांधींनी दिला आहे,सध्या वातावरण गढूळ होत चालले आहे,लोकांना धर्माच्या नावावर वाटण्याचा प्रयत्न केला जात आहे,मात्र आम्ही सर्व जाती धर्माच्या लोकांनी याला भीक न घालता हातात हात घालून 'एकता' दाखवावी व 'प्रेमाच्या' माध्यमातून द्वेषाचा बिमोड करु,असेही खा.इम्रान प्रतापगढी यांनी सांगितले .
याप्रसंगी नगरध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे,नगरसेवक पदाचे शिवसेनेचे उमेदवार कमलाकर चव्हाण,नितीन कासार,अमृत पुदाले,गफुर कुरेशी,इमाम शेख,मुन्ना शेख,करिम इनामदार,माजी नगराध्यक्षा रेखा जगदाळे,संतोष पुदाले, हारिश जाधव ,खलील सय्यद,मोहियोद्दीन सय्यद, आबेदिन कुरेशी,काँग्रेस कमिटीचे महेबूब पटेल यांच्यासह महिला उमेदवार मंचावर उपस्थित होते. यावेळी अशोक जगदाळे यांच्यासह अनेकांनी भाषण करत विरोधकांवर टिका केली. या सभेप्रसंगी नागरिकांची गर्दी झाली होती,महिलांची उपस्थिती मोठी होती,कार्यक्रमाचे प्रास्ताविक कमलाकर चव्हाण तर सूत्रसंचालन सय्यद ताजोद्दीन सावकार यांनी केले, सभेला नागरिकांनी गर्दी केली होती.