भिमनगर, बौध्दनगर मधील समस्या सोडवून नागरिकांची सोय करणार आहे अपक्ष उमेदवार महादेवी बनसोडे ; दिवंगत नगराध्यक्ष अशोक बनसोडे यांची राजकीय पार्शवभूमी
नळदुर्ग ,दि.३०:
नळदुर्ग शहरामधील प्रभाग क्र १० मध्ये विकास कामे करून प्रभागात सर्व सोयी सुविधा पुरविण्याचे काम करू, तसेच प्रभागात गटारी, मजबूत रस्ते आणि दररोज पाणी पुरवठा,आरोग्य, स्वछता आदी सारख्या मूलभूत सुविधा देवून नागरिकांची सोय करण्याचे काम केले जाईल असे आश्वासन नगरसेविका पदाच्या अपक्ष उमेदवार महादेवी अशोक बनसोडे
यांनी बौद्धनगर येथे आयोजित कोपरा सभेत दिले.
मूलभूत सुविधेसह सर्वसामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्या बरोबरच घर जागेची नोंद घेवून त्यांना ८ अ नक्कल देऊ आणि रमाई आवास योजना,प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम करणार असल्याचे यावेळी बनसोडे यांनी बोलताना सांगितले.
या भागात मूलभूत सुविधा पुरविण्यास स्वछता, पाणी पुरवठा, महिलांचे आरोग्याचे प्रश्न सोडविण्यासाठी विशेष लक्ष असणार आहे.याप्रसंगी सपना बनसोडे, भागीरथी बनसोडे, सोनम बनसोडे, प्रमोद कांबळे, दुर्वास बनसोडे, प्रकाश बनसोडे, नामदेव बनसोडे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवंगत नगराध्यक्ष अशोक बनसोडे यांची राजकीय पार्शवभूमी:-
नळदुर्ग सार्वत्रिक निवडणुक २०२५ प्रभाग क्रमांक दहा मधील एस.सी.महिलासाठी राखीव असलेल्या जागेवर अपक्ष म्हणून दिवंगत माजी नगरध्यक्ष अशोक बनसोडे यांच्या सुविद्य पत्नी महादेवी बनसोडे या निवडणुक रिंगणात आहेत,त्यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक दहा मध्ये विविध ठिकाणी पदयात्रा, कोपरा सभा घेण्यात येत आहे, त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, दिवंगत अशोक दादाराव बनसोडे हे अपक्ष म्हणून १९९६ साली निवडणुक लढविली होती. त्यात त्यांचा दणदणीत विजय झाला होता. त्यानंतर त्यांनी १९९८ साली नगरध्यक्ष पदाची धुरा सांभाळली, त्यांच्या कार्यकाळात शहरात विविध ठिकाणी विंधन विहिरी खोदण्यात आले,मोक्याचा ठिकाणी स्ट्रीट पोल उभे करून पथदिवे बसवून काळोख दूर केला. तसेच सिमेंट रस्ते, नवीन पाणी पुरवठा पाईपलाईन अंथरून पाण्याची सोय केली. असे त्यांच्या कार्यकाळात शहरात 'विकास' कामे करण्यात आले.