नळदुर्ग शहराचा कायापालट करण्याकरिता काँग्रेस -शिवसेना ठाकरे युतीच्या उमेदवारांना नगरपालिकेची सत्ता द्या - काँग्रेसचे  माजी मंत्री विद्यमान आमदार अमित देशमुख 

नळदुर्ग,दि.३० :


  विलासराव देशमुख पहिल्यांदा मुख्यमंत्री असता त्यावेळी राज्यावर फक्त ४० हजार कोटी रुपयांचे कर्ज होते. मात्र महाराष्ट्र राज्याचा डोक्यावर आज १० लाख कोटीचा कर्जाचा डोंगर वाढला असुन  प्रत्येकाच्या डोक्यावर एक लाख कर्जाचा वाटा  आहे. नळदुर्ग शहराचा कायापालट करण्याकरिता,मतदारांनी शहराच्या उज्वल भविष्यासाठी नळदुर्ग नगरपालिकेची सत्ता अशोक जगदाळे यांच्या हातात देण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी मंत्री तथा विद्यमान आमदार अमित देशमुख यांनी नळदुर्ग येथे केले .


काँग्रेस -शिवसेना उबाठा पक्षाचे  नळदुर्ग नगरपालिका निवडणुकील उमेदवारांच्या प्रचारार्थ शनिवार रोजी जाहीर सभेत अमित देशमुख हे बोलत होते.


व्यासपीठावर खासदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे, आमदार प्रवीण स्वामी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड धिरज पाटील, निरीक्षक आनंद पाताडे, शिवसेनेचे उमेदवार कमलाकर चव्हाण, यांच्यासह सर्व उमेदवार , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामचंद्र आलुरे, शिवसेनेचे डॉ जितेंद्र कानडे, सरफराज काझी आदींची प्रमुख उपस्थिती होती.


 खासदार ओमराजे निंबाळकर  बोलताना  म्हणाले की, राजकीय घराणेशाही मुळे गेल्या ४५ वर्षात जिल्ह्याचा विकास खोळंबला आहे.हा जिल्हा देशातील दारिद्री जिल्ह्याचा यादीत तिसऱ्या स्थानावर आहे,सध्या जिल्हा नियोजन समितीचा ३४० कोटींचा निधी अडकून पडला आहे, त्याला शासनाने स्थिगिती दिली गेली आहे,जिल्ह्याचा विकास साधायचा असेल तर काँग्रेस-शिवसेनेला साथ द्या,येणाऱ्या  मार्च २०२७ पर्यंत सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या लोहमार्गाचे काम पूर्ण होवून इंजिनची चाचणी घेण्यात येणार आहे .यामुळे तीर्थक्षेत्र रेल्वेला जोडले जावून या भागाचा विकासाला चालना मिळेल.


नळदुर्ग शहर हे ऐतिहासिक शहर आहे,शासनकर्ते आमची सत्ता आली नाही तर निधीला कात्री लावण्याचा भाषा बोलत आहेत, सत्ता कुणाचीही असो निधी ओढून आणू,निधी हा कुणीही रोखू शकत नाही असे सांगत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर टीका करुन काँग्रेस शिवसेना उबाठाच्या उमेदवाराना  निवडून दण्याचे सांगितले.यावेळी अशोक जगदाळे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जाहीर सभेपुर्वी  विराट पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेच्या माध्यमातून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी सुधीर पोतदार, ताजोद्दीन सावकार, आदीसह काँग्रेस - शिवसेना उबाठाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, महिलासह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक कमलाकर चव्हाण यांनी तर आभार संतोष पुदाले यांनी मानले.


 




 
Top