सहकार चळवळीतून भरघोस निधी आणून शहराचा विकास करू -सहकारमंत्री बाबासाहेब पाटील
नळदुर्ग,दि.२९ :
विकासाच्या माध्यमातून नळदुर्गला न्याय मिळाला नाही, नळदुर्ग हे तालुका दर्जाचे शहर असूनही म्हणावी तशी प्रगती येथे झाली नाही ,या निवडणुकीत राष्ट्रवादीला संधी दयावी, सहकार खात्याचा माध्यमातून शहरात उद्योग 'लघु उद्योग, धंदे आणून बेरोजगार आणि महिलांच्या हाताला काम देवू असे आश्वासन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले आणि सर्व नगरसेवकांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत दिले.
नगरपालिका सार्वञिक निवडणुक पार्श्वभूमीवर नळदुर्ग येथील राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवार(२८) रोजी जाहीर सभा सायंकाळी डी एड कॉलेज रोडवर पार पडली. याप्रसंगी व्यासपीठावर आ. ईद्रीस नाईकवाडी,आ.विक्रम काळे, गोकुळ शिंदे,प्रचार प्रमुख शफी शेख, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले, माजी उपन्गराध्यक्ष मुश्ताक कुरेशी, अजित जुनेदी उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना बाबासाहेब पाटील म्हणाले की, नळदुर्ग शहराला वैभवशाली ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे, मात्र चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता गेली तर या शहराची आवस्था भकास होईल, हे टाळण्यासाठी राष्ट्रवादीला पुनःश्च संधी द्या, आम्ही सहकार चळवळीच्या माध्यमातून विविध योजनेतून भरघोस निधी देवून उद्योग धंदे आणि लघु उद्योगना चालना देवू.
यावेळी सभेला उपस्थित आ. ईद्रीस नाईक बोलताना सांगितले की, अल्पसंख्यांक समाजाच्या उन्नत्ती,सुरक्षितेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे नेहमी प्राधान्य देतात, अल्पसंख्याक समाजाच्या ज्या काही समस्या आहेत, त्या सोडवल्या जातील,अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याचे काम अजित दादाच्या माध्यमातून करीत आहोत.मागच्या निवडणुकीत नळदुर्ग तालुका करण्याचे आश्वासन देवुन अनेक जन जिंकुन आलेत,माञ त्यांनी काहीच प्रयत्न केले नाही,यंदा पालिकेची सत्ता जणतेनी राष्ट्रवादीच्या हातात द्यावी. मी स्वता शहराच्या विकास करण्यासाठी कटिबद्ध असणार आहे,उपमुख्यमंत्री अजित दादाकडून कधीही निधी कमी पडु देणार नाही.
आ. विक्रम काळे म्हणाले की, मागच्या वेळेस ज्यांचाकडे सत्ता होती, त्यांनी, शहराचा काहीच विकास केला नाही, ते फक्त पक्षांतर करून इकडून तिकडे उड्या मारत बसलेत, राष्ट्रवादीच्या हातात सत्ता दिल्यास वर्षभरात शहराचा कायापालट केला जाईल असेही ते म्हणाले. यावेळी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संजय बताले,शफी शेख, मुश्ताक कुरेशी अजहर जाहगीरदार, रवी महाराज राठोड, प्रमोद कुलकर्णी, अँड आनंद बताले,यांच्यासह सर्व नगरसेक पदाचे उमेदवार नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते, प्रास्ताविक शफी शेख यांनी तर आभार मुश्ताक कुरेशी यांनी मानले.