काँग्रेस-शिवसेना उबाठा उमेदवारांच्या प्रचारार्थ आज शनिवारी नळदुर्ग शहरात माजी मंत्री अमित देशमुख यांची जाहिर सभा
नळदुर्ग ,दि.२९ :
काँग्रेस-शिवसेना उबाठा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अशोक जगदाळे व सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी मंत्री अमित विलासराव देशमुख, धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर,आमदार प्रविण स्वामी यांची नळदुर्ग शहरात शनिवार दि-२९ नोव्हेंबर रोजी दुपारी १ वाजता जाहिर सेनेचे आयोजन करण्यात आले आहे.
उमेदवाराच्या प्रचारासाठी राष्ट्रीय महामार्ग बसस्थानक ते किल्ला गेट मार्गे भवानी चौक भव्य पदयात्रा काढण्यात येणार आहे. या पदयात्रेचे भवानी चौकात दुपारी १ वाजता जाहीर सभेत रुपांतर होणार आहे. तरी नागरिकांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे .