आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या  मार्गदर्शनाखाली सर्वांगीण विकासासाठी वचनबध्द; पालिकेची सत्ता एक हाती देण्याचे नय्यर जहागिरदार  यांचे आवाहन 

नळदुर्ग ,दि.२८:
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्या बरोबरच घर जागेची अट अ नक्कल देऊन रमाई,/प्रधानमंत्री आवास योजनांचा लाभ मिळवून देण्याचे काम राज्यात सत्तेवर असलेल्या भाजप शिवाय कोणी करू शकणार नाही, गोरगरीब लोकांना हक्काचे पक्के कबाले मिळवून देवू, आणि मूलभूत सुविधा पुरविण्याचे कामास प्रथम प्राधान्य देण्याचे प्र.क्र.१०उमेदवार नय्यर जहागिरदार यांनी सांगितले.
भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बुद्धनगर येथे कोपरा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी  नय्यर जहागिरदार हे बोलत होते. 
नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बसवराज धरणे, नगरसेवक पदाचे प्रभाग दहाचे उमेदवार  साक्षी नळदुर्गकर ,प्रभाग क्रमांक आठचे दत्तात्रय कोरे, शोभा कांबळे भाजपचे राज्य सदस्य सिद्धेश्वर कोरे, अरविंद पाटील, माजी जि. प. अध्यक्षा अस्मिता कांबळे आदीजण  उपस्थित होते. 

यावेळी  माजी जि.प. अध्यक्षा अस्मिता ताई कांबळे म्हणाल्या की. सर्व जाती धर्माला घेऊन जाणारा भाजप सर्वात मोठा पक्ष असून लोकहित व विकासाला प्राधान्य देणार आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पुढाकारातून नळदुर्ग शहरामध्ये पाच एकर क्षेत्रावर भव्य बुद्धविहीर ( विपश्यना केंद्र)  साकार होत आहे . दिवंगत नगरसेवक दयानंद बनसोडे यांचे स्वप्न असलेल्या संविधान चौकात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यासाठी तसेच  दिनदुबळ्याचे स्वप्न साकार करण्यासाठी भाजप-शिंदे शिवसेनाच्या सर्व उमेदवारांना विजयी करुन नगरपालिकेची सत्ता एक हती देण्याचे आवाहन  त्यांनी  आवाहन केले.
यावेळी बसवराज धरणे, विनायक अहंकारी, प्रमोद कांबळे, साक्षी नळदुर्गकर यांनी मनोगत व्यक्त केले.
 
  कार्यक्रमाचे प्रस्ताविक दुर्वास बनसोडे यांनी केले. तर महिला मोर्चाच्या प्रीती कदम, माजी नगरसेवक किशोर नळदुर्गकर,धिमाजी घुगे, गजेंद्र सोनवणे, पप्पु पाटील, सचिन डुकरे , अशोक बंजारे यांच्यासह महिला व पुरुष, नागरिक  उपस्थित होते. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व आभार धिमाजी घुगे यांनी मानले.
 
Top