विकासाचा झंझावात भाजपचे सिद्धेश्वर  कोरे ; आगामी  नंदगाव जिल्हा परिषद (गटात) निवडणुक गाजणार 
 

नळदुर्ग,दि.२४ :

आगामी होणा-या जिल्हा परिषद निवडणुकीत
नंदगाव जिल्हा परिषद गटात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक 
माजी पंचायत समिती सदस्य सिद्धेश्वर कोरे  यांनी पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे.

कामातून ओळख निर्माण करणारे,विकासाला प्राधान्य देणारे आणि जनतेशी थेट नाळ जोडणारे नेतृत्व अशी सिध्देश्वर कोरे यांची ओळख आहे. सर्वाधिक निधी खेचून आणणारे,प्रभावी आणि कामदार पंचायत समिती सदस्य म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. रस्ते,पाणी पुरवठा,वीज, आरोग्य, शिक्षण,अंगणवाड्या,पशुवैद्यकीय दवाखाना ते सामाजिक विकासाच्या असंख्य योजना त्यांच्या कार्यकाळात मार्गी लागल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामुळेच "सिद्धू अण्णा म्हटले की  काम बोलतं."ही ओळख आजही जनतेच्या मनात ठामपणे रुजलेली आहे.

आमदार राणाजगजितसिंह पाटील  यांचे विश्वासू शिलेदार म्हणून  कोरे पुढे येत असून,दोघांमधील समन्वय,विश्वास आणि विकासाचा समान दृष्टिकोन नंदगाव भागातील राजकारणात निर्णायक ठरत असल्याचे जाणकारांचे मत आहे.संघटनात्मक ताकद,प्रशासनावरील पकड आणि प्रदीर्घ अनुभवामुळे ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे खंदे पाठबळ मानले जातात.

नंदगाव जिल्हा परिषद गटातील सिदगाव, कुन्सावंळी, बोळेगाव, नंदगाव ,सलगरा, बोरगांव, लोहगाव, खुदावाडी,  दहीटणा, येडोळा, रामतीर्थ ,वागदरी ,गुजनुर ,जकणी तांडा, पाटील तांडा, घोडके तांडा, नरवडे तांडा ,गायरान तांडा , गावठाण तांडा व विविध वस्त्या,तांड्यांसह तुळजापूर तालुक्यातील अनेक गावांत त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य,विविध विकास सोसायट्यांचे चेअरमन आणि तरुण कार्यकर्त्यांची मजबूत फळी हे त्यांचे प्रमुख बळ मानले जाते. 

विकासकामांच्या बाबतीत सिद्धू अण्णांची ठळक कामगिरी  

 प्रत्येक निवडणुकीत अती महत्वाची कामे बजावणारे गाव म्हणजे नंदगाव, या गावातील लोकांनी नेहमीच विकासाच्या पाठीशी राहिले आहे. ग्रामस्थाना नंदगाव ते सलगरा ये जा करण्यासाठी  जवळपास 6 कि.मी रस्त्यांची दुरवस्था झाल्याने  ग्रामस्थांनी रस्त्यासाठी मतदानावर बहिष्कार घातला असता आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्ता मंजूर करून घेतला. दिलेल्या शब्दावर विश्वास ठेवून नंदगाव ग्रामस्थांनी बहिष्कार मागे घेतला आणि भरघोस मतांनी राणा दादाना निवडून दिले.
मौजे शहापूर, यडोळा, दहीटणा  या ठिकाणी  आमदार राणादादा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिवृष्टीमुळे झालेल्या घराची पडझड व संसारिक वस्तूंचे झालेले नुकसान या संदर्भात पाहणी करण्यासाठी गेलो असता एक हात मदतीचा याप्रमाणे फुल ना फुलाची पाकळी मदत करण्याचे आश्वासन देऊन काही कुटुंबाला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. छोट्या,मोठ्या गावातील युवा,ज्येष्ठ नेत्यांना संधी देऊन भाजप पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. गावातील जरी सरपंच असले किंवा कार्यकर्ता असले त्यांना निवडून आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे.

नंदगाव परिसरातील राजकारणात सामाजिक सलोख्याचे ठोस उदाहरण म्हणून सिद्धू आणा यांचे नाव घेतले जाते.नंदगाव जिल्हा परिषद गटात निर्णायक भूमिका घेणारे मतदार म्हणजे मराठा लिंगायत,मुस्लिम,बहुजन,बंजारा,धनगर  तसेच इतर सर्व समाजघटकांशी त्यांचे जिव्हाळ्याचे व विश्वासाचे संबंध आहेत.जाती-धर्माच्या चौकटी पलीकडे जाऊन सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

विकासकामे,मूलभूत सुविधा,सामाजिक प्रश्न असोत किंवा अडचणीच्या काळात मदतीचा हात सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका त्यांनी  सातत्याने निभावली आहे.त्यामुळेच विविध समाजघटकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी,विश्वास आणि सकारात्मक भावना दिसून येते.

सर्वांना सोबत घेऊन,सर्वांसाठी काम करणारे हे नेतृत्व म्हणजेच नदगाव तील सामाजिक ऐक्याचे बळकटीकरण करणारा केंद्रबिंदू ठरत आहे.
नंदगाव जिल्हा परिषद गटात सर्वसमावेशक विकासाची भूमिका प्रत्यक्षात उतरवणारे नेतृत्व म्हणून  त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विशेषतः सर्व समाजाच्या विकासासाठी  सर्वाधिक निधी उपलब्ध करून आणले आहे.


दफनभूमी, विकास, बोअरवेल व पाणीपुरवठा व्यवस्था,तसेच समाज मंदिर यांसारख्या अत्यावश्यक सुविधांसाठी त्यांनी जिल्हा परिषद व विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून भरीव निधी मंजूर करून घेतला.या कामांमुळे अनेक गावांतील  समाजाला दीर्घकालीन दिलासा मिळाला असून,त्यांच्या दैनंदिन गरजांना प्रत्यक्ष आधार मिळाला आहे.

पद,धर्म किंवा राजकारणाच्या चौकटीत न अडकता "सर्वांचा विकास"हा दृष्टिकोन केंद्रस्थानी ठेवून काम करणारे नेतृत्व म्हणून सिद्धू अण्णा  यांच्याकडे पाहिले जाते. दुर्गम भागातील वंचित घटक असोत किंवा अल्पसंख्यांक वस्त्या कोणताही समाज त्यांच्या लक्षाबाहेर राहिलेला नाही,हे त्यांच्या कामातून स्पष्टपणे दिसून येते...

नंदगाव गटातील सर्व समाजामध्येही त्यांच्या कार्याबद्दल विश्वासाची भावना निर्माण झाली असून,विकासकामांमुळे "सिद्धू अण्णा म्हणजे दिलेला शब्द पूर्ण करणारा नेता" अशी प्रतिमा अधिक दृढ होत चालली आहे.

आज नंदगाव जिल्हा परिषद गटात सिद्धू अण्णा हे सर्वाधिक चर्चेत असलेले नेतृत्व ठरत आहेत.ते पुन्हा एकदा "फुल ॲक्शन मोड" मध्ये उतरल्याचे स्पष्ट चित्र आहे.जर त्यांना पुन्हा संधी मिळाली,तर आमदार राणा दादा यांना अधिक बळ मिळून नंदगाव गटातून मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत सिद्धू आणा नवा राजकीय इतिहास घडवतील,अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात सुरू आहे.

 
Top