अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या  जुलेखा इनामदार यांनी महिला उमेदवारामधून सर्वात जास्त मते घेवुन दणदणीत विजयी 


नळदुर्ग,दि.२२:


नळदुर्ग नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ७ मधून जुलेखा इनामदार ह्या तब्बल २५५ मतांनी दणदणीत विजयी झाल्या आहेत.त्यांनी प्रतिस्पर्धी शाहना बेगम खतीब यांचा पराभव केला आहे.
अत्यंत चुरशीच्या आणि उत्कंठा वर्धक ठरलेल्या नगरपरिषदेच्या प्रभाग क्र ७ च्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून,काँग्रेस तर्फे नगरसेवक पदाच्या उमेदवार जुलेखा मैनोद्दीन इनामदार यानी विजयश्री मिळविला आहे,त्यांनी तब्बल ७९८ मते घेऊन निवडून आल्या आहेत.


 दरम्यान जुलेखा इनामदार या पहिल्यांदाच निवडणुक रिंगणात उभे होत्या,आणि नगरसेवक पदी विराजमान होण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. काँग्रेसच्या उमेदवार जुलेखा इनामदार यांना ७९८ मते मिळाली तर त्यांच्या विरोधामध्ये उभे असलेले राष्ट्रवादीच्या उमेदवार शहाणा खातीब यांना ५४३ मतांवर समाधान मानावे लागले आहे.
इनामदार यांच्या कुटूंबातून पहिल्यांदाच नगरसेवक म्हणून नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणून धाडल्यामुळे प्रचंड उत्साहाचे वातावरण पसरले आहे,या विजयाचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे,या प्रसंगी इनामदार कुटुंब व प्रभागातील मतदारांनी सय्यद मोहियोद्दीन, जैनुल अबेद्दीन इनामदार, शमसोद्दीन इनामदार, अवेज इनामदार व इतरांनी  पुष्पहार, शाल, श्रीफळ देवून व पेढे  भरवून त्यांच्या सत्कार केला.

 
Top