माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यावतीने  भाजपाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव  पाटील यांचा सत्कार



मुरुम, दि.२७ :

भारतीय जनता पक्षाचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बापुराव  पाटील यांची भाजपाचे नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी मुरुम येथील त्यांच्या निवासस्थानी दि.26 डिसेंबर  रोजी भेट देऊन सत्कार केला आणि अभिनंदन करत  पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर यावेळी 
 माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांचाही नुतन नगराध्यक्ष बापुराव  पाटील व युवा नेते शरण पाटील यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

 यावेळी भाजपाचे युवा नेते शरण बसवराज पाटील,भाजपा लोहारा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील,परंडा न.प. नवनिर्वाचित नगरसेवक रमेशसिंह परदेशी,भाजपा लोहारा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला,भाजपा उमरगा शहराध्यक्ष ॲड साईराज टाचले, नगरसेवक तथा भाजपा मुरुम शहराध्यक्ष गणेश अंबर,महालिंग बाबशेट्टी,राजूभाई मुल्ला,उत्कर्ष गायकवाड, काशीनाथ गायकवाड, महादेव कोरे,यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top