सोमनाथ गुड्डे नवी दिशा , नवी आशा
नंदगाव जिल्हा परिषद गटाचे उदयोन्मुख नेतृत्व
नळदुर्ग,दि.२७:
तुळजापूर तालुक्यातील नंदगाव जिल्हा परिषद गटातून शिवसेना ( शिंदे गट) तर्फे इच्छुक उमेदवार म्हणून उदयास आलेले सोमनाथ गुड्डे हे दहिटणा (ता. तुळजापूर) येथील शेतकरी कुटुंबातील, समाजकारणाची ओढ असलेले कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. विद्यार्थी दशेपासून त्यांनी सामाजिक कामाचा ध्यास घेतला असून विशेषतः महिला सक्षमीकरण, युवक रोजगार, गावविकास या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
गावविकासातील ठोस कामगिरी
दहिटणा ग्रामपंचायतीत सलग दोन वेळा पॅनेल विजय मिळवून संघटनशक्ती सिद्ध उपसरपंच पदाचा कार्यकाळ यशस्वी, गावात विविध विकासकामे वेगात , बंदिस्त गटार योजना, सिमेंट रस्ते, घरकुल योजना, रक्तदान शिबिरे, अशा अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी केल्याचे बोलले जात आहे.
12 बचत गटांमार्फत महिला सक्षमीकरण, कर्जसहाय्य व प्रशिक्षण ,युवा आणि महिलांसाठी सातत्यपूर्ण उपक्रम राबविले आहे.
सोमनाथ गुड्डे यांनी केवळ गावापुरते मर्यादित न राहता पुणे येथे ‘राजमाता अहिल्याबाई होळकर रिक्षा असोसिएशन’ स्थापन केली. त्याद्वारे ग्रामीण भागातील युवकांना शहरात रोजगार मिळवून देण्याचे मोठे कार्य त्यांनी केले.
दरवर्षी दहिटणा येथे राजमाता अहिल्याबाई होळकर जयंती उत्सव भव्यदिव्य पद्धतीने साजरा करून महिलांना विविध पुरस्कारांनी गौरविण्याची परंपरा त्यांनी सुरू केली आहे.
जनशुभदा फाउंडेशनद्वारे समाजकार्य
गेल्या 5 वर्षांत जनशुभदा फाउंडेशन मार्फत विविध उपक्रमांची अंमलबजावणी, युवकांसाठी क्रिकेट स्पर्धा, विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, राज्यस्तरीय नृत्य स्पर्धा, समाजातील कर्तृत्ववान व्यक्तींना पुरस्कार व सन्मान, मागील निवडणुकीतील अल्प फरकाचा पराभव यंदा विजय निश्चित मानले जात आहे.
मागील निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून त्यांनी निवडणूक लढविली होती. मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळून देखील अतिशय कमी फरकाने पराभव झाला. मात्र, जनतेशी असलेला सातत्यपूर्ण संवाद, विकासकामांवरील विश्वास, आणि नेतृत्वगुण पाहता या वर्षी सोमनाथ गुड्डे यांना पसंती असल्याचे मतदारांमध्ये वातावरण आहे.
नंदगाव गटातील मतदारांत बहुजन समाजाच्या मेहनती नेत्याला साथ देणार, अशी चर्चा होत आहे. गावविकास, समाजकारण आणि परिवर्तनाच्या वाटचालीसाठी सोमनाथ गुड्डे यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.