भाजपचे नवनिर्वाचित  नगराध्यक्ष बसवराज धरणे यांचा पदग्रहण सोहळा ; आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप नेते सुनिल चव्हाण, दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती, नळदुर्ग नगरपालिका कारभाराचा  नवा पर्व सुरु , 

नळदुर्ग,दि.२९ डिसेंबर 

नळदुर्ग नगरपालिकेच्या राजकारणात नव्या पर्वाची सुरुवात होत असून भाजपचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष बसवराज धरणे आज  सोमवार दि.२९ डिसेंबर  रोजी रोजी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी नगराध्यक्षपदाचा अधिकृत कार्यभार स्वीकारणार आहेत. यानिमित्ताने नगरपालिकेत पदग्रहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या पदग्रहण सोहळ्यास भाजपचे आमदार, मित्र संस्थेचे उपाध्यक्ष  राणाजगजितसिंह पाटील, निवडणूकीत गेम चेंजर ठरलेले  भाजप नेते सुनिल चव्हाण, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नितीन काळे आदीची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.  तरी नळदुर्ग शहारातील प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सर्वपक्षाचे प्रमुख, व्यापारी बांधव, विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व शहरातील नागरिकांनी या पदग्रहण सोहळ्यास  उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 नगराध्यक्षपदाचा  हा बसवराज धरणे यांचा पहिलाच औपचारिक प्रवेश असल्याने शहरवासियांत उत्सुकता लागली आहे. निवडणूकीत मतदारानी बसवराज धरणे यांची नगराध्यक्षपदी निवड केली. सर्व धर्मियात लोकप्रिय असणारे  धरणे हे मनमिळाऊ असुन  सहज उपलब्ध होणारे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धरणे यांच्याकडून नळदुर्ग शहराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा  व्यक्त केली जात आहे. आज नगरपालिकेत होणाऱ्या पदग्रहण सोहळ्यास  पदाधिकारी,  नगरसेवक, कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती राहणार आहे.  

 
Top