नळदुर्ग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी भाजपचे नय्यरपाशा जहागीरदार यांचा विजय; काँग्रेसचे मारुती खारवे यांचा पराभव
स्विकृत सदस्य म्हणून पत्रकार सुधीर पोतदार, प्रवीण गायकवाड
नळदुर्ग ,दि.१६ :
नळदुर्ग नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदासाठी
शुक्रवार दि.१६ जानेवारी रोजी झालेल्या निवडणुकीत उपनगराध्यक्षपदी भाजपाचे नगरसेवक नय्यर जहागीरदार हे विजयी झाले आहे, त्यांनी काँग्रेसचे मारुती खारवे यांचा पराभव केला. या निवडणुकीत नय्यरपाशा जागीरदार यांना १२ तर मारुती खारवे यांना ९ मते मिळाली.
२० नगरसेवक असलेल्या सभागृहात भाजपा नगराध्यक्षासह १०, शिवसेना एक व काँग्रेस ९ असे पक्षीय बलाबल आहे.यानुसार जाहगीरदार यांना बारा मते तर कांग्रेसचे खारवे यांना ९ अशी मते मिळाली, तसेच भाजपाकडून लहुजी शक्ती सेना युवक शहराध्यक्ष प्रविण धनराज गायकवाड यांची तर काँग्रेसकडून अशोक जगदाळे यांचे विश्वासू सुधीर पोतदार यांची स्वीकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
नगरपालिकेच्या सभागृहात उपनगराध्यक्षपदाची निवडणूक पार पडली. यावेळी पिठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्ष बसवराज धरणे व नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामकृष्ण जाधव उपस्थित होते.या निवडणूक प्रक्रिया दरम्यान सर्व नगरसेवक सभागृहात उपस्थित होते.
या निवडणुकीत स्वीकृत सदस्य म्हणून भाजपकडून प्रविण धनराज गायकवाड, तर काँग्रेसकडून पत्रकार सुधीर बाबुराव पोतदार यांची नियुक्ती करण्यात आली त्याचबरोबर भाजपचे गटनेते म्हणून दत्तात्रय दासकर तर काँग्रेसच्या गटनेतेपदी मारुती खारवे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नगराध्यक्ष बसवराज धरणे यांनी नवनिर्वाचित उपनगराध्यक्ष नय्यरपाशा जागीरदार तसेच स्वीकृत सदस्य प्रविण गायकवाड व सुधीर पोतदार यांचा सत्कार करून स्वागत केले.