भाजपकडून काटगाव जि.प.गटासाठी रविकिरण माळी यांचा अर्ज दाखल
खानापूर ,दि.१८:
भारतीय जनता पार्टीकडून जिल्हा परिषद काटगाव गटासाठी रविकिरण माळी यांनी अधिकृतपणे इच्छुक अर्ज दाखल केला आहे. पक्ष कार्यालयात पार पडलेल्या या प्रक्रियेमुळे काटगाव गटातील राजकीय हालचालींना वेग आला आहे.
यावेळी रविकिरण माळी यांनी पक्ष संघटनेवर पूर्ण विश्वास व्यक्त करत, जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने कार्य करण्याची आपली भूमिका स्पष्ट केली. ग्रामीण विकासाला चालना देणे, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवक व महिला सक्षमीकरण, पायाभूत सुविधा तसेच स्थानिक मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
इच्छुक अर्ज दाखल करण्याच्या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी रविकिरण माळी यांना शुभेच्छा देत, पक्षाच्या धोरणानुसार आणि संघटनेच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.
काटगाव गटाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहून जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्याचा संकल्प रविकिरण माळी यांनी यावेळी केला. काटगाव गटातील खानापूर, घट्टेवाडी, चव्हाणवाडी, धोत्री,पिंपळा,पिंपळा (खुर्द) देवकुरुळी,खडकी,तामलवाडी, सुरतगाव, शिवाजीनगर (तांडा ) या गावातील तरुण वर्गातून रवी किरण माळी यांच्या नावाची चर्चा होत आहे.