विद्यार्थ्याच्या कला गुणांना संधी निर्माण करण्यासाठी स्नेहसंमेलन महत्वाचे- जिल्हा परिषद निवडणूक इच्छुक उमेदवार सोमनाथ गुड्डे 

नळदुर्ग,दि.१८:

आजच्या स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबर त्याच्यातील  कला गुणांना संधी निर्माण  करण्यासाठी स्नेहसंमेलन महत्वाचे आहे, असे मत जनशुभदा फाउंडेशनचे अध्यक्ष तथा नंदगाव जि.प. गटाचे इच्छुक उमेदवार सोमनाथ गुड्डे व्यक्त केले आहे.

नंदगाव ता. तुळजापूर येथील हवाई मल्लिनाथ इंग्लिश स्कूलच्या वार्षिक संमेलनात अध्यक्ष पदावरून सोमनाथ गुड्डे हे बोलत होते. यावेळी नंदगाव मठाचे श्री राजशेखर महाराज, काटे गुरुजी, सामाजिक कार्यकर्ते मारुती बनसोडे, संजय घोडके, सुरेश अरबळे, आदीसह गावातील प्रतिष्ठित नागरिक  उपस्थित होते.
 
यावेळी बोलताना सोमनाथ गुड्डे पुढे म्हणाले की, या शाळेतील विद्यार्थी भविष्यात मोठे होऊन आपल्या गावाचे नाव मोठे करतील असे सांगुन विद्यार्थी, पालक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी गावातील महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top