माजी सभापती प्रकाश चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अशोक पाटील यांचा काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत कार्यकर्त्यांसह भाजपात प्रवेश


तुळजापूर,दि.१९:

तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथिल माजी सभापती  तथा माजी जि.  सदस्य प्रकाश चव्हाण व कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोक पाटील यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत बहुतांश  समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत प्रवेश सोहळा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. 

या भाजप प्रवेशामुळे तुळजापूर तालुक्यातील जळकोट जिल्हा परिषद मतदार संघात काँग्रेस पक्षाला ऐन निवडणुकीत  धक्का बसला आहे.   जळकोट  मतदार संघात राजकीय घडामोडीना वेग आला आहे. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, युवा नेते सुनील चव्हाण, मल्हार  पाटील,  प्रदेश कार्यकारणी सदस्य नितीन काळे, संताजी  चालूक्य यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी आलियाबाद ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच ज्योती चव्हाण, रामतीर्थ ग्रामपंचायतीचे  लक्ष्मण राठोड, निवृत्त नायब तहसिलदार माणिक चव्हाण आदीसह आजी , माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य भाजपात प्रवेश केला. विशेष म्हणजे आलियाबाद ग्रामपंचायतीवर आजवर काँग्रेसची एकहाती सत्ता होती. मात्र प्रकाश चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिल्याने  या भागात भाजपाची  ताकद वाढणार  आहे.


यावेळी  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी भाजपाची विकासाची भूमिका, केंद्र व राज्य सरकारच्या लोकाभिमुख योजनांचा उल्लेख करत नव्याने प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत केले. भाजपाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी एकत्र काम करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

 
Top