धाराशिव जिल्ह्याचे जावाई , दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नळदुर्ग शहरात सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी वाहिली श्रध्दांजली; व्यापा-यांनी सर्व व्यवहार ठेवले बंद
नळदुर्ग, दि.२९:
धाराशिव जिल्ह्याचे जावाई , दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नळदुर्ग शहरात सर्व पक्षीय भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
गुरुवार दि.२९ जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजता नळदुर्ग शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या चावडी चौकात व्यापारी संघटना, राष्ट्रवादी ,भाजप, शिंदे शिवसेना, ठाकरे शिवसेना, काँग्रेस, एमआयएम आदीसह सर्व पक्षीय पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहिली.यावेळी उपस्थितांनी अजित पवार यांच्या कर्तव्यनिष्ठ, समाजाभिमुख व मूल्यनिष्ठ कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांनी संवेदनशील स्वभावामुळे अनेकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्र राज्यात मोठी पोकळी निर्माण झाली असून ती कधीही न भरून येणारी आहे.अशा भावना व्यक्त करण्यात आल्या.
यावेळी शहरातील व्यापा-यानी आपले सर्व व्यवहार बंद ठेवले होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष शफीभाई शेख, संजय बताले, महेबुब शेख, नगराध्यक्ष बसवराज धरणे, सुशांत भूमकर, नगरसेवक तानाजी जाधव , शशिकांत पुदाले, रिजवान काझी, सुधीर पोतदार, मारुती खारवे, दत्तात्रय दासकर, बलदेव ठाकूर, शिवाजी सुरवसे, स्वप्निल काळे, मिनहाज इनामदार, संजय मोरे , दयानंद जाधव, विनायक अहंकारी, संतोष पुदाले, रवी राठोड, दयांनद स्वामी, सुधीर हजारे,, शहबाज काझी, बाळू वाघमारे, खालेद इनामदार, मुकूंद नाईक, सुभाष कोरे, सतीश पुदाले,प्रमोद कुलकर्णी, दत्तात्रय कोरे, समीर मोरे, रमेश फिस्के, किरण राठोड, सागर हजारे, अनिल पाटील, जमन ठाकुर, सुधीर पाटील, सरदार सय्यद, पद्माकर घोडके, बशीर शेख, किशोर नळदुर्गकर, धिमाजी घुगे, बाळासाहेब महाबोले, सचिन डुकरे , अँड आनंद बताले आदीसह व्यापारी , विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि पत्रकार विलास येडगे, प्रा.दिपक जगदाळे, शिवाजी नाईक, उत्तम बणजगोळे, अमर भाळे, लतीफ शेख आदी उपस्थित होते.