ऐन निवडणुकीत नंदगाव गटातील महाविकास आघाडीच्या बहुसंख्य कार्यकर्त्यांनी केला भारतीय जनता पार्टीत प्रवेश ; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले स्वागत
नळदुर्ग,दि.२७:
ऐन निवडणुकीत तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथिल महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते राम राम करत भारतीय जनता पार्टीत आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजप महायुतीचे जि.प. नंदगाव गटाचे उमेदवार सिध्देश्वर कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला आहे.या प्रवेश सोहळयाने नंदगाव गटात भाजप पक्षाची ताकद वाढली असल्याचे अधोरेखित होत आहे.
नंदगाव ता. तुळजापूर येथील महाविकास आघाडीतील प्रमुख कार्यकर्ते, तंटामुक्त समितीचे उपाध्यक्ष शिवाजी तात्याराव भोसले, माजी उपसरपंच कमलाकर गुरुलिंगप्पा तुप्पे, माजी सरपंच वालचंद कांबळे यांच्यासह चंद्रकांत बनसोडे, नवनाथ वाघमारे, राजेंद्र गुडडे, दिलीप बिराजदार, विठ्ठल सुरवसे तसेच अनेक महिला भगिनींनी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केला.
विकास, स्थैर्य आणि लोकहिताच्या ठोस कार्यावर विश्वास ठेवत नंदगावमधील कार्यकर्त्यांनी भाजपची वाट निवडली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय व सामाजिक संघर्षासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये नंदगाव गटातून भाजपा महायुतीला मताधिक्य देत विजयाचा झेंडा फडकवण्याचा ठाम निर्धार उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या प्रवेशावेळी नंदगाव गटाचे महायुतीचे उमेदवार श्री.सिद्धेश्वर कोरे, यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व महिला भगिनी उपस्थित होते.